शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या हक्कासाठी ‘विमाशि’ कटीबद्ध

By admin | Updated: January 23, 2015 00:09 IST

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या हक्कासाठी कटीबद्ध आहे. मात्र संबंधितांकडून समस्या सोडविण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे, असे मत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे...

यवतमाळ : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकांच्या हक्कासाठी कटीबद्ध आहे. मात्र संबंधितांकडून समस्या सोडविण्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे, असे मत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी मांडले. संघाच्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. प्रांतिक उपाध्यक्ष राम बरोटे हे अध्यक्षस्थानी होते. येथील सहकार भवनात आयोजित अधिवेशनात जिल्हाभरातून शिक्षक सहभागी झाले होते. जिल्हा कार्यवाह अरविंद देशमुख यांनी संघटनेने मागील वर्षभरात केलेली आंदोलने आणि सोडविलेल्या समस्या याची माहिती दिली. प्रसंगी डायगव्हाणे यांनी २०१३-१४ ची संच मान्यता कशी चुकीची आहे आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या यावर मार्गदर्शन केले. २००५ पूर्वी लागलेल्या सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी या व इतर समस्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. संघाचे जिल्हाध्यक्ष अशफाक खान, नागपूर जिल्हा कार्यवाह कारेमोरे, अमरावती जिल्हाध्यक्ष गजानन बुरघाटे, वाशिम जिल्हाध्यक्ष जनार्दन शिंदे, सुरेंद्र कडू यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. प्रसंगी माजी कार्यवाह एम.डी. धनरे, माजी कार्याध्यक्ष चोपडे, साहेबराव गावंडे, अंकुश वाकडे, पवन बन उपस्थित होते. यानिमित्त झालेल्या आमसभेत नवीन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.डी. धनरे तर सहायक म्हणून उमाकांत चोपडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)