शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

महसूल अधिकाऱ्यांचे रजा आंदोलन

By admin | Updated: December 11, 2015 03:00 IST

राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही नायब तहसीलदारांना वेतनश्रेणी दिली जात नसल्याने महसूल अधिकारी संघटनेने गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन छेडले.

अपर अधिकाऱ्यांचाही सहभाग : संपूर्ण जिल्ह्यातील कामकाज थांबलेयवतमाळ : राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही नायब तहसीलदारांना वेतनश्रेणी दिली जात नसल्याने महसूल अधिकारी संघटनेने गुरुवारी सामूहिक रजा आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महसूल विभागाचे कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांसह सर्व नायब तहसीलदार या आंदोलनात सहभागी झाल होते. शासनाने नायब तहसीलदारांना वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांचा दर्जा दिला. हा दर्जा दिल्यानंतरही वेतनश्रेणीत मात्र वाढ केली नाही. इतर विभागातील वर्ग-३ च्या कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी नायब तहसीलदारांपेक्षा अधिक आहे. या कर्मचाऱ्यांना चार हजार ८०० ते पाच हजार इतकी वेतनश्रेणी दिली जाते. वर्ग-२ दर्जावर गेलेल्या नायब तहसीलदारांना मात्र चार हजार ३०० इतकीच वेतनश्रेणी दिली जात आहे. दर्जा वाढवूनही वेतनश्रेणी मात्र वर्ग-३ कर्मचाऱ्यांपेक्षाही कमी आहे. शासनाने नायब तहसीलदारांची वेतनश्रेणी चार हजार ६०० रुपये करावी या मागणीसाठी हे सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास १ जानेवारी २०१६ ला लेखणीबंद आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे सचिव दिलीप झाडे यांनी दिली. या आंदोलनाला सर्व उपजिल्हाधिकारी संघटनांनी पाठिंबा दिला. जिल्ह्यातील सर्वच उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. इतकेच नव्हे तर विभागीय स्तरावर महसूल उपायुक्तांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. जिल्ह्यात तहसीलदारांची २८ पदे रिक्त आहेत. अशा ठिकाणी नायब तहसीलदारच कामकाज सांभाळतात. महसुलातील शेवटचा अधिकारी असल्याने नायब तहसीलदारांकडे जबाबदाऱ्या सोपविल्या जातात. केवळ दर्जा वाढवून शासनाने बोळवणच केल्याचा आरोप आहे. (कार्यालय प्रतिनिधी)