शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत सिंचन विहिरींच्या मुदतीचा ठराव

By admin | Updated: June 14, 2014 02:34 IST

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत बियाणे आणि खताच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत बियाणे आणि खताच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. याशिवाय धडक सिंचन विहिरींना मुदतवाढ मिळावी, असा ठराव घेण्यात आला. बैठकीत बोअरवेलचाही मुद्दा गाजला. सभेच्या सुरुवातीलाच मागील इतिवृत्ताचे वाचन करून त्याला मान्यता देण्यात आली. सदस्यांनी धडक सिंचन विहिरीचा मुद्दा उपस्थित करून त्या केव्हा पूर्ण होतील, असा प्रश्न विचारला. यावर संबंधित अधिकाऱ्याने विहिरी पूर्ण होतीलच, असे ठासून सांगितले. पावसाळ्यात विहिरी कशा होणार, हा प्रतिप्रश्न विचारताच त्या अधिकाऱ्याने मान खाली घातली. विहिरींचे बहुतांश प्रस्ताव तहसीलदाराकडे प्रलंबित असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यानंतर अनिल नरवाडे यांनी महागावमध्ये बोअरवेल झालेच नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. बियाण्याच्या उगवण शक्तीबाबत सदस्यांनी साशंकता व्यक्त केल्यानंतर कृषी विकास अधिकाऱ्याकडून केवळ सारवासारव करण्यात आली. देवानंद पवार यांनी जिल्हा परिषदेत किती चौकशी समित्यांचे गठण करण्यात आले, याची विचारणा केली. याबाबत अधिकाऱ्यांकडून संयुक्तिक उत्तर मिळाले नाही. वणी तालुक्यातील वेळाबाई, तरोडा, पुनवट येथे कुठलीही ग्रामसभा न घेता ग्रामसेवकाने परस्परच परवानगी दिल्याचा मुद्दा संगीता राजूरकर आणि उमा पिदूरकर यांनी मांडला. राहुल ठाकरे यांच्या सुचनेनुसार नेर तालुुक्यातील सातेफळ येथील जलस्वराज्यच्या विहिरीचा मुद्दा चर्चेत आला. सिंचन विभागाच्या विहीर खोदल्याने गावातील पाणीपुरवठा बंद आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिला असून हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्याकडे असल्याचे सांगण्यात आले. शाळा दुरुस्तीच्यासंंदर्भात आठ दिवसाच्या आत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यादेश देण्याची सूचना केली. चिरकुटा, दाभा रस्त्याच्या गुणवत्ता तपासावी, अशी मागणी दिवाकर राठोड यांनी केली. ७५० किलोमीटरच्या रस्ते दुरुस्तीसाठी १६६ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. यापैकी २२ कोटी ८४ लाख मंजूर झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, विभाग प्रमुख उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)