शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव रोडवरील १०० वृक्षांचे पुनर्रोपण

By admin | Updated: June 20, 2017 01:13 IST

रस्ते विकास करताना सावली देणारी परिपक्व झाडे नष्ट होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने वृक्ष पुनर्रोपणाचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग : ७० ते १०० वर्षे जुनी झाडे जांब रोडवर हलविणारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्ते विकास करताना सावली देणारी परिपक्व झाडे नष्ट होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याने वृक्ष पुनर्रोपणाचा निर्णय घेतला आहे. त्यातून धामणगाव रोडवरील ७० ते १०० वर्षे जुन्या १०० झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. दळणवळण वेगवान व्हावे म्हणून रस्त्यांची लांबी-रुंदी वाढवून रस्ते चौपदरी केले जात आहेत. परंतु रस्त्यांचा हा विकास करताना त्यात अडसर ठरणाऱ्या ७० वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाडांची सर्रास कत्तल केली जाते. यामुळे महामार्गावर सावली मिळेनाशी झाली आहे. आपल्या डोळ्यादेखत सर्रास होणारी परिपक्व वृक्षांची ही कत्तल पाहून सामान्य नागरिकांचे मनही हळहळते आहे. वृक्षांची ही कत्तल थांबविण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम खात्याने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वृक्ष पुनर्रोपणाचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग धामणगाव रोडवर केला जाणार आहे. धामणगाव रोडवरील पोस्ट आॅफीस चौक ते बाजार समिती चौक दरम्यान १०० परिपक्व वृक्ष आहेत. ही वृक्षे तेथून उचलून पर्यायी जागी किंवा जांब रोडवर १०० एकरमध्ये होऊ घातलेल्या फॉरेस्ट गार्डनमध्ये शिप्ट केले जाणार आहेत. मुंबई-पुण्याच्या एजंसीला त्याचे कंत्राट देण्यात आले. प्रत्येक झाडाच्या पुनर्रोपणावर २५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. सुमारे २५ लाखांचे बजेट असलेल्या या पुनर्रोपण कामाला दोन दिवसात प्रारंभ होणार आहे. मुंबई-ठाण्यात हे प्रयोग यशस्वी झाले आहे. ११ किमी रस्त्याचे चौपदरीकरणधामणगाव रोडवरील पोस्ट आॅफीस चौक ते करळगाव या ११ किलोमीटरच्या मार्गाचे केंद्रीय रस्ते निधीतून चौपदरीकरण केले जात आहे. हे चौपदरीकरण करताना दोन किलोमीटरचा घाट सरळ करून रस्त्याचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न होतो आहे. या मार्गात सहा पुल आहेत, दोनही बाजूला आठ मीटरचा रस्ता आहे, रस्त्याची रुंदी सर्व ठिकाणी १० मीटर केली जाणार आहे, वळण कमी करण्याचा प्रयत्न आहे, तीन पूल पूर्ण झाले आहे, घाटातही दोन पूल आहेत. डिव्हायडर, नाली, फूटपाथ, स्टेट बँक चौकाचे सौंदर्यीकरण अशा अनेक बाबी यात समाविष्ठ आहेत. दीड वर्षात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पुढील पावसाळ्यापूर्वी हा मार्ग चौपदरी झालेला असेल, असे बांधकाम खात्यातून सांगण्यात आले. या मार्गावर आतापर्यंत अमरावतीचे मुख्य अभियंता शेखर तुंगे, गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता मुरादे, तेथील कार्यकारी अभियंता, यवतमाळचे अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के व त्यांच्या अधिनस्त चमूने अनेकदा भेटी देऊन कामांच्या सुधारणेबाबत सूचना केल्या आहेत. त्याचवेळी कामाच्या गतीबाबत समाधानही व्यक्त केले आहे. आठ वर्षांपूर्वी सात कोटी रुपये खर्च करून दारव्हा रोडच्या नऊ किलोमीटरचे चौपदरीकरण करण्यात आले होते. धामणगाव रोडसाठी ४५ कोटींचे बजेट मंजूर करण्यात आले. त्यामुळे दारव्हा रोडपेक्षाही उत्तम धामणगाव रोड होणार असल्याचे बांधकाम विभागातून सांगण्यात आले. रस्ते विकास महामंडळामध्ये केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रयोगाचा डेमो दाखविला होता. १६० ते १७० वर्षे जुनी वृक्षे अगदी सुरक्षितरीत्या ट्रान्सप्लान्ट केली जातात. यवतमाळात धामणगाव रोडवर ट्रान्सप्लान्टचा पहिला प्रयोग केला जात आहे. तो यशस्वी झाल्यास सीआरएफच्या अन्य दोन रस्त्यांवर आणि जिल्ह्यात सर्वदूर तो लागू केला जाईल. वडगाव रोडवरील वन उद्यानात किंवा विशेष झोन निर्माण करून ही १०० वृक्षे स्थानांतरित केली जातील. - मदन येरावार, बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री, यवतमाळ. धामणगाव रोडवर रिप्लॅन्टेशनचा जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग होत आहे. ८० ते १०० झाडे तेथून उचलून सुरक्षितरीत्या हलविली जाणार आहे. - एस.व्ही. सोनटक्के अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम, यवतमाळ