शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांची भीस्त वर्गणीवर

By अविनाश साबापुरे | Updated: January 21, 2024 19:02 IST

केंद्रासाठी निधीच नाही : तालुकास्तरासाठी मिळणारा पैसाही अपुरा.

 यवतमाळ : जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खेळ व क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धाही घेतल्या जात आहेत. मात्र केंद्र स्तरीय स्पर्धेसाठी निधीच नाही. तर तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी अपुरा निधी मिळत असल्याने यजमान शाळांनाच लोकवर्गणी करून स्पर्धा घ्यावी लागत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत निधीची मागणी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये साधारणत: एक लाख ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी सांघिक व वैयक्तिक क्रीडा सामने, तसेच त्यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धाही केंद्र, तालुका व जिल्हा स्तरावर घेतल्या जातात. स्पर्धेची पहिली फेरी केंद्र स्तरावर होत असून स्पर्धेकरिता कोणताही निधी उपलब्ध होत नाही. शिक्षकांकडून वर्गणी करून तसेच शाळा संलग्नता फी संकलीत करून गोळा होणाऱ्या निधीतील ५० टक्के रक्कम खर्च करून सामने पार पाडले जातात. तसेच शाळांकडे खेळ व क्रीडा यासाठी स्वतंत्र निधी नसतो. मैदान तयार करणे, खेळ साहित्य खरेदी, उद्घाटन कार्यक्रम, पारितोषिक हा खर्च आयोजक शाळेला करावा लागतो. त्यासाठी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

दुसऱ्या फेरीचे आयोजन तालुका स्तरावर केले जाते. तालुक्यातील एखाद्या केंद्रातील शाळेला यजमान पद देऊन आयोजन केले जाते. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील प्रत्येक केंद्राची चमू स्पर्धेत सहभागी होत असून सुमारे दोन हजार खेळाडू विद्यार्थी सहभागी होतात. यावेळी उद्घाटन, चहापान, पारितोषिक, क्रीडा साहित्य खरेदी, मंडप, लाउडस्पीकर, पाणी आदी खर्चासह विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. जिल्हा स्तरावरुन उपलब्ध होणाऱ्या ५० हजार रुपयांत सदर खर्च भागवणे शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षकांसह सामान्य नागरिकांकडून लोकवर्गणी केली जाते. क्रीडा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे तालुकास्तरीय स्पर्धेकरिता दोन लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे समितीने सीईओ डाॅ. मैनाक घोष यांच्याकडे निवेदन दिले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, जुनी पेन्शन आघाडी प्रमुख प्रफुल्ल पुंडकर, सुभाष पारधी, संदीप टुले आदी उपस्थित होते. प्रत्येक केंद्राला १० हजार, तालुक्याला दीड लाख द्यासन २०१७ पर्यंत केवळ सांघिक खेळ घेतले जात होते. पण आता वैयक्तिक क्रीडा प्रकारांचाही समावेश करण्यात आला. कबड्डी, लंगडी व खो-खो, धावणे, उंच उडी, लांब उडी, कॅरम, बॅडमिंटन, भालाफेक, थाळीफेक, टेनिक्वाइट, योगासने आदी स्पर्धा घेण्यात येत आहेत. परंतु, केंद्रस्तरीय सामन्यांसाठी कोणताही निधी मिळत नाही. तालुका व जिल्हास्तरीय क्रीडा सामन्यांचे आयोजन सध्यस्थितीत उपलब्ध होणाऱ्या निधीत कठीण जात आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्राला १० हजार रुपये व तालुका स्तरीय स्पर्धेला दीड लाख रुपये अनुदानाची तरतूद जिल्हा परिषद निधीतून करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ