शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

गॅस तपासणीच्या नावाखाली वसुली

By admin | Updated: July 14, 2016 02:31 IST

गॅस उपकरणांची कुठल्याही प्रकारे तपासणी न करता येथे ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे.

ग्राहकांची दिशाभूल : तपासणीशिवाय तयार होतो अहवाल यवतमाळ : गॅस उपकरणांची कुठल्याही प्रकारे तपासणी न करता येथे ग्राहकांची आर्थिक लूट केली जात आहे. ‘उपकरण चेकिंग चार्ज’च्या नावाखाली रक्कम वसूल करण्यात येत आहे. येथे एका गॅस एजन्सीने सुरू केलेला हा प्रकार डोळ्यात धूळफेक करणारा आहे. गॅस तपासणी आणि शुल्काला ग्राहकांचा विरोध नाही. मात्र कुठलीही तपासणी न करता केवळ कागदावर ‘टीक’ मार्क करून उकळल्या जाणाऱ्या रकमेविषयी प्रचंड नाराजी आहे. पुरवठा विभागाने हा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. घरी गॅस सिलिंडर पुरविणारा व्यक्तीच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करतो. गॅसविषयी त्याला किती ज्ञान आहे, हे एजन्सी चालकांनाच माहीत, पण त्याला मेकॅनिकल म्हणून ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोबत असलेल्या एका कागदावर हो/नाही मध्ये माहिती भरावयाचा कागदावर तो स्वत:च टिक करतो. अर्धा एक मिनिटात त्याची दारातूनच तपासणी पूर्ण होते. पूर्ण २८ टिक झाल्यानंतर ग्राहकाच्या हाती कागद सोपवून रकमेची मागणी केली जाते. सिलिंडरचा वापर कसा करावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठली खबरदारी घ्यायला पाहिजे या दृष्टीने तपासणी आणि मार्गदर्शन या मेकॅनिककडून अपेक्षित आहे. पण त्याने स्वत: केलेल्या होय/नाही या टिक मजेशीर आणि नागरिकांची कशी दिशाभूल करणाऱ्या आहेत, हे दिसून येते. सिलिंडर सरळ ठेवले आहे, प्रेशर रेग्यूलेटरचा दाब ठिक आहे, रबर ट्यूबची लांब आवश्यक तेवढी आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही असे दिली जातात. एवढेच नाही तर स्वयंपाक घरात उजेड आहे, याचे उत्तरही नाही, असेच असते. ग्राहकाला रेग्यूलेटर चांगल्या प्रकारे लावता येते काय, याचेही उत्तर नाही असेच आहे. एवढे सर्व दोष असताना प्रत्यक्ष मार्गदर्शन किती केले जाते, हा प्रश्न आहे. त्याहीपुढे जाऊन आपत्तीकाळात काय करायला पाहिजे, याचेही उत्तर नाही असेच आहे. खरंच एजन्सीकडून होणारी तपासणी सुरक्षेच्या दृष्टीने आहे, की रक्कम उकळण्यासाठी हा प्रश्न आहे. काहीही न करता होणारी रुपये वसुली ग्राहकांच्या संतापात भर टाकणारी आहे. या बाबी एजन्सीच्या संचालकांना माहीत नसाव्या याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या हितासाठी कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)