शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठा समितीकडून वसुली करा

By admin | Updated: July 5, 2017 00:11 IST

ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत रखडलेल्या, अपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या गावांतील समितीकडून तातडीने निधीची वसुली करावी, ...

जलव्यवस्थापन : जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश, पोलिसांत तक्रार दाखललोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत रखडलेल्या, अपूर्ण पाणीपुरवठा योजनांच्या गावांतील समितीकडून तातडीने निधीची वसुली करावी, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी दिले. जलव्यवस्थापन समितीची बैठक मंगळवारी माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी यवतमाळ तालुक्यातील तीन, आर्णी, घाटंजी, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यातील प्रत्येकी एक, राळेगाव व दारव्हामधील प्रत्येकी तीन गावांमधील पाणीपुरवठा योजना रखडल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी सदर समित्यांनी निधीची उचल केली आहे. निधीची उचल करूनही त्यांनी योजनेचे काम पूर्ण केले नाही. या सर्व गावांमधील पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीकडून या निधीची येत्या ३१ जुलैपर्यंत तातडीने वसुली करण्याचे निर्देश अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. यापैकी काही गावांमधील समिती पदाधिकारी व सदस्यांविरूद्ध थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. उर्वरित रखडलेल्या पाणीपुरवठा योजना आता चौदाव्या वीत्त आयोगाच्या निधीतून करण्याचे निर्देेशही यावेळी देण्यात आले. बैठकीत पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी तब्बल दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.मागणी १५० कोटींची, मिळाले ११ कोटीजिल्हा परिषदेने शौचालयांसाठी तब्बल १५० कोटींच्या निधीची राज्य शासनाकडे मागणी केली होती. मात्र शासनाकडून केवळ ११ कोटी मिळाले. या तोकड्या निधीतून शौचालयांची कामे पूर्ण कशी करावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही कामे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात येणार आहे. मात्र निधीअभावी स्वच्छ भारत मिशनचे काम रखडण्याची शक्यता बळावली आहे.