शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

गैरआदिवासींना दिलेले लाभ वसूल करा; केंद्र सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 11:27 IST

आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर नोकरी पटकावणाऱ्या गैरआदिवासींना केंद्राने मोठा फटका दिला आहे. २००९ नंतर अशा कर्मचाऱ्यांनी जे आर्थिक लाभ घेतले आहेत, ते सर्व वसूल करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक-प्रशिक्षण विभागासह वित्त विभागानेही दिले आहेत.

ठळक मुद्दे बँका, रेल्वे, एलआयसी, वित्त कंपन्या, महामंडळातील कर्मचाऱ्यांवर बडगा

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागांवर नोकरी पटकावणाऱ्या गैरआदिवासींना केंद्राने मोठा फटका दिला आहे. २००९ नंतर अशा कर्मचाऱ्यांनी जे आर्थिक लाभ घेतले आहेत, ते सर्व वसूल करावे, असे आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक-प्रशिक्षण विभागासह वित्त विभागानेही दिले आहेत. बँका, रेल्वे, एलआयसी, वित्तीय कंपन्या आणि महामंडळांतील गैरआदिवासी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.केंद्र सरकारच्या सेवेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर लागलेल्या कोष्टी, हलबा कोष्टी यांच्या नोकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कार्मिक व प्रशिक्षण विभागाने १० ऑगस्ट २०१० रोजी परिपत्रक जारी केले होते. या विरोधात ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनने ९ जानेवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने १५ सप्टेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात केंद्राचे हे परिपत्रकच रद्द ठरविले. त्यामुळे सरकारला घटनाबाह्य असलेले आपलेच परिपत्रक ३० ऑगस्ट २०१८ रोजी मागे घ्यावे लागले आणि गैरआदिवासींवर कारवाई करण्याचे सर्व विभागांना आदेश द्यावे लागले.तरीही अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नव्हती. अखेर फेडरेशनच्या पाठपुराव्यानंतर भारत सरकारच्या वित्त विभागाने १२ मार्च रोजी आपल्या अधिनस्त असलेले सर्व विभाग, सार्वजनिक बँका, रिझर्व्ह बँक, वित्तीय कंपन्या, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. तर कार्मिक व प्रशिक्षण विभागानेही ८ एप्रिल रोजी परिपत्रक काढून अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर नोकरी मिळविणाऱ्या कोष्टी, हलबा कोष्टी जातीच्या कर्मचाऱ्यांना २८ नोव्हेंबर २००० पर्यंतच संरक्षण दिले. त्यानंतर मात्र अनुसूचित जमातीचे घेतलेले लाभ वसूल करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. जातवैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता सर्वसाधारण प्रवर्गात शेवटच्या बिंदूनंतर धरावी, असे या आदेशात म्हटले आहे.सर्वसाधारण प्रवर्गातील बेरोजगारांना फटकाकेंद्र सरकारकडून सर्व विभागांना गैरआदिवासी कर्मचाºयांवर कारवाईचे आदेश जारी झाले आहे. २८ नोव्हेंबर २००० पूर्वी अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर केंद्र सरकारच्या सेवेत लागलेल्या गैरआदिवासींचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील रिक्त जागा प्रभावित होणार आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार युवकांना याचा जबर फटका बसणार आहे.

संघटना यासंदर्भात गेल्या १५ वर्षांपासून न्यायालयीन लढा लढत आहे. अखेर सर्वोच्च न्यायालयानेच दणका दिला आणि केंद्र सरकारलाही हा आदेश काढावा लागला. मात्र, अशा कर्मचाऱ्यांना २००० पर्यंत संरक्षण देण्याच्या निर्णयाविरुद्धही पुनर्विलोकन याचिका तयार आहे. त्याच्या खर्चाची तरतूद राज्य शासनाने करावी.- प्रा. मधुकर उईके, केंद्रीय अध्यक्ष,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन

टॅग्स :Governmentसरकार