शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेतील पिछाडीने पुरकेंची हुरहूर वाढली

By admin | Updated: June 14, 2014 23:51 IST

प्रचंड परिश्रम घेऊनही लोकसभा निवडणुकीत वसंत पुरके काँग्रेसला मतांची आघाडी मिळवून देऊ शकले नाही. तेथे शिवसेनेला तब्बल २७ हजारावर मतांची आघाडी मिळाल्याने काँग्रेसची हुरहूर वाढली आहे.

मतदार नेत्यांचे ऐकण्याचा मानसिकतेत नाही : युतीकडे सक्षम उमेदवाराचा अभाव राजेश निस्ताने - यवतमाळ प्रचंड परिश्रम घेऊनही लोकसभा निवडणुकीत वसंत पुरके काँग्रेसला मतांची आघाडी मिळवून देऊ शकले नाही. तेथे शिवसेनेला तब्बल २७ हजारावर मतांची आघाडी मिळाल्याने काँग्रेसची हुरहूर वाढली आहे. विधानसभेच्या राळेगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व काँग्रेसचे वसंत पुरके करीत आहे. शिक्षण खात्याची धुरा सांभाळलेल्या पुरकेंना पक्षाने नाराज न करता विधानसभेचे उपाध्यक्षपद बहाल करून पुन्हा लालदिवा दिला. राळेगाव मतदारसंघात सलग दहा वर्षांपासून लालदिवा चमकत असला तरी त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचा मतदारांचा सूर आहे. आजही मतदार पुरके सरांनी मतदारसंघासाठी काय केले, असा सवाल करीत आहे. एकही मोठा प्रकल्प न आणल्याने बेरोजगारांची समस्या कायम आहे. प्रकल्पग्रस्त, शेतकऱ्यांची अवस्थाही जैसे थे आहे. आदिवासी नेते शिवाजीराव मोघे यांना लोकसभेत पाठवून राज्यमंत्री मंडळाची वाट आपल्यासाठी कायमची मोकळी करून घेण्याचा पुरकेंचा मनसुबा होता. त्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. परंतु लोकसभा निवडणुकीत कुणीच पुरकेंचे ऐकले नाही. पर्यायाने भावना गवळींची गेल्या वेळी असलेली मतांची आघाडी किंचितही कमी होऊ शकली नाही. मतदारांनी ‘हात’ दाखविल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. हीच स्थिती विधानसभेत तर राहणार नाही ना, या चिंतेने पुरके समर्थकांना ग्रासले आहे. महायुतीकडे सक्षम उमेदवार नसणे ही पुरकेंसाठी जमेची बाजू आहे. परंतु कळंब, बाभूळगाव, राळेगाव या तीनही तालुक्यातील मतदारात ‘आता यांना पाडा रे’चा नारा लावला जात आहे. एकदा चेंज करू, त्याला न जमल्यास पुन्हा जुनाच चेहरा देऊ, अशा मानसिकतेत मतदार आले आहे. विक्रीकर खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्यानेही लोकसभेत शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या आघाडीचा आकडा पुढे करून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यामुळे पुरकेंना मतदारसंघातच पर्याय उभा झाला आहे. एखादवेळी पुरके विरोधकांसाठी हा तिसरा सक्षम पर्याय ठरू शकतो. या अधिकाऱ्याच्या गाडीमध्ये पुरके विरोधक आणखी किती दिवस फिरतात, याकडे लक्ष लागले आहे. महायुतीकडून प्रा. अशोक उईके यांचे नाव चर्चेत आहे. त्यांनी पहिली निवडणूक शिवसेनेकडून तर दुसरी अपक्ष म्हणून लढविली होती. हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला आहे. गेल्या वेळी आयपीएस अधिकारी बाबासाहेब कंगाले यांना भाजपाने रिंगणात उतरविले होते. यावेळी भाजपाचा उमेदवार मीच असा दावा करित उईके मतदार संघात फिरत आहेत. गतवेळच्या २० लाखांच्या खर्चाचे भांडण अद्याप न मिटल्याने राष्ट्रवादीचा गट कुणाकडे राहतो, हे पाहणे महत्वाचे आहे. ही रक्कम देऊन मनोमिलन करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहे.