शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आरबीएस’ने लावला अनेकांना चुना

By admin | Updated: August 14, 2014 00:07 IST

सात हजार २०० रुपयांची पाच वर्षात तीन लाख १९ हजार रुपये देण्याचे आमिष देऊन पुण्यातील आरबीएस मल्टीकेअर प्रा.लि. कंपनीने महागाव तालुक्यातील शेकडो ग्राहकांना चुना लावल्याचे पुढे आले आहे.

महागाव : सात हजार २०० रुपयांची पाच वर्षात तीन लाख १९ हजार रुपये देण्याचे आमिष देऊन पुण्यातील आरबीएस मल्टीकेअर प्रा.लि. कंपनीने महागाव तालुक्यातील शेकडो ग्राहकांना चुना लावल्याचे पुढे आले आहे. कंपनीने दिलेले धनादेश अनादरीत झाल्याने ग्राहकांनी महागाव पोलिसात धाव घेतली. मंगळवारी उशिरा रात्री कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुणे येथील आरबीएस मल्टीकेअर प्रा.कंपनीने तालुक्यातील अनेकांना भरघोस परतावा देण्याचे आमिष दिले. २००९ पासून सदर कंपनी ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत होती. सुरुवातीला सात हजार २०० रुपये भरले की, पाच वर्षाने तीन लाख १९ हजार रुपये परत देण्यात येतील, असे सांगण्यात येत होते. एवढेच नाही तर कंपनीचे अधिकारी महागाव येथे येऊन प्रोजेक्टरद्वारे आपल्या कंपनीची माहिती देत होते. या भूलथापांना बळी पडून अनेकांनी त्यात पैसे गुंतविले. परंतु मुदत संपल्यानंतर परतावा घेण्याची वेळ आली त्यावेळी दिलेले धनादेश वटलेच नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आले. ग्यानबा एकनाथ बुटे, अनंता नागरगोजे यांना कंपनीने प्रत्येकी पाच लाख रुपयाचा एचएचबीसी बँकेचा धनादेश दिला होता. तर अशोक तांंदळे यांना चार लाख रुपयांचा आणि संतोष गुट्टे यांना १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र ग्यानबा बुटे यांना दिलेला पाच लाखांचा धनादेश वटला नाही. त्यामुळे ग्यानबा बुटे, अनंता नागरगोजे, अशोक वाल्मिक इंगळे रा. महागाव, संतोष भगवान बुटे रा. बुटेवाडी जि.बीड यांनी काल रात्री महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून कंपनीचे संचालक रमेश बुधवाले व इतर संचालकांविरुद्ध भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महागावचे ठाणेदार अरुण आगे यांनी आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केले आहे. आरोपींंना अटक झाल्यानंतर सत्य बाहेर येईल. (शहर प्रतिनिधी)