शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षपदासाठी नगरपरिषदेत रस्सीखेच

By admin | Updated: May 31, 2014 23:46 IST

येथील नगराध्यक्षपदापेक्षा आता उपाध्यक्ष पदासाठी जादा रस्सीखेच सुरू झाली आहे. पुढील महिन्यात या दोनही पदांसाठी निवडणूक होत असल्याने अनेक जण गुडघ्याला बाशींग बांधून तयार झाले आहेत.

वणी : येथील नगराध्यक्षपदापेक्षा आता उपाध्यक्ष पदासाठी जादा रस्सीखेच सुरू झाली आहे. पुढील महिन्यात या दोनही पदांसाठी निवडणूक होत असल्याने अनेक जण गुडघ्याला बाशींग बांधून तयार झाले आहेत.येथील २५ सदस्यीय नगरपरिषदेत सत्ताधारी गटाकडे तूर्तास बहुमत कायम आहे. पुढील नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. २५ सदस्यांमध्ये विद्यमान सत्ताधारी गटाच्या अपक्ष नगरसेविका करुणा कांबळे आणि विरोधकांतर्फे मनसेच्या नगरसेविका प्रिया लभाने या दोनच महिला या प्रवर्गातील आहे. त्यामुळे या दोनपैकीच कुणीतरी एक नगरसेविका नगराध्यक्षपदावर विराजमान होणार आहे. नगराध्यक्षपद आरक्षित असल्याने आता उपाध्यक्षपदाकडे सर्वांचे डोळे लागले आहे.  विद्यमान उपाध्यक्ष कैसर पटेल यांचीही मुदत संपणार असल्याने या पदावर नवीन चेहरा निवडला जाणार आहे. विद्यमान सत्ताधार्‍यांमध्ये राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचे तीन, कॉंग्रेसचे दोन, भाजपाचा एक तर चार अपक्षांचा समावेश आहे. विरोधात मनसेचे आठ आणि तीन अपक्ष नगरसेवक आहेत. सध्या नगराध्यक्षपद शिवसेनेकडे, तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसकडे आहे. काही अपक्ष सभापती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही सभापती पदे भूषविली आहेत.नगराध्यक्षपदाच्या आरक्षणामुळे उपाध्यक्ष पदासाठी प्रथमच प्रचंड चुरस निर्माण झाली. या पदावर अनेकांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधातील काही नगरसेवकांनाही उपाध्यक्षपद चांगलेच खुणावत आहे. हे पद पदरात पाडून घेण्यासाठी पडद्यामागील हालचालींना आता चांगलाच वेग आला आहे. कोणत्या पद्दतीने आपण उपाध्यक्ष होऊ, याची चाचपणी केली जात आहे. या पदामुळे प्रचंड उलथापालथ होण्याची शक्यता आहे.सत्ताधारी आणि विरोधी दोनही बाजूचे नगरसेवक उपाध्यक्ष पदावर बसण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहे. त्यासाठी ‘जुगाड’ केले जात आहे. गणिते मांडली जात आहे. अमुकाने अर्ज केला, तर तमुक तसे करणार, आणि तमुकाने अर्ज भरला, तर अमुक असे करणार, याचे चित्र रंगविले जात आहे. दोन्ही बाजूकडील काही नगरसेवक या पदाच्या निवडीसाठी वेगवेगळे ‘डावपेच’ आखत आहे. त्यासाठी प्रसंगी फोडाफोडी करण्याची तयारीही सुरू झाली आहे. मागील नगरपरिषदेच्या कार्यकाळात शेवटची अडीच वर्षे नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी परस्परपूरक सत्ता चालविली. त्यात अनेकदा नगराध्यक्ष रजेवर असायचे. त्यामुळे उपाध्यक्षांकडे पदभार यायचा. त्या काळात अनेक महत्वाची कामे व्हायची. आताही तीच पद्धत राबविण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे. यावेळी कुणीही नगराध्यक्ष झाले, तरी खरी चावी उपाध्यक्षांकडेच  राहण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष केवळ नामधारी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने सत्ताधार्‍यांची पावले पडत असल्याने ही शक्यता आणखी बळावली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)