शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदाराविरुद्ध खंडणी, मारहाणीचा गुन्हा

By admin | Updated: July 14, 2016 02:31 IST

उमरखेड येथील भाजपाचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे

वन परिक्षेत्र अधिकारी : पुसदमध्ये गुन्हा दाखल पुसद : उमरखेड येथील भाजपाचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्यावर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे ५० हजार रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा येथील वसंतनगर ठाण्यात बुधवारी दाखल करण्यात आला. वन विभागातील अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी दुपारी येथील वन विभागीय कार्यालयात सुरू होती. दरम्यान उत्तमराव इंगळे तेथे आले. त्यांनी डीएफओ कमलाकर धामगे यांच्याकडे वनपरिक्षेत्र अधिकारी किसनराव तरटेकर यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार केली. यावेळी इंगळे यांना चौकशी करण्याचे आश्वासन दिले. परंतु यावर समाधान न झाल्याने त्यांनी तरटेकर यांच्या अंगावर धाऊन जाऊन शिविगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंगळे यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली, ती पूर्ण न केल्याने त्यांनी अशाप्रकारे वचपा काढल्याचे तरटेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोप फेटाळले या प्रकरणी उत्तमराव इगळे यांनी सर्व आरोप फेटाळले. ते म्हणाले, आपण २५ वर्षांपासून राजकारणात असून कुणाला ५० हजार कशाला मागू, तेवढे पैसे तर आपण गरजू कार्यकर्त्याला देतो. उमरखेड येथील १ कोटी ३२ लाख रुपयांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या बाबात आपणाकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो होतो. वन विभागात भ्रष्टाचार असून त्याची लिंक आरएफओ सह सबंधित डीएफओ आणि यवतमाळ सीसीएफ गुरमे यांच्यापर्यंत असल्याचा आरोपही उत्तमराव इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. (प्रतिनिधी)