शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिनींचा रुद्रावतार

By admin | Updated: November 14, 2015 02:47 IST

दारूच्या नशेत गावात अशांतता निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्यांचा डाव येथील दारूबंदी, व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या महिलांनी उधळून लावला.

दारूचा अड्डा उद्ध्वस्त : मांगलादेवी येथे मोहामाच आणि सडवा नष्टमांगलादेवी : दारूच्या नशेत गावात अशांतता निर्माण करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवू पाहणाऱ्यांचा डाव येथील दारूबंदी, व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या महिलांनी उधळून लावला. दिवाळी सणाच्या दिवशी रणरागिनींचा हा रुद्रावतार संपूर्ण गावाला थक्क करून गेला. २० पिपे मोहामाच आणि ड्रम या महिलांनी उलटविले. गावात विकल्या जाणाऱ्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. युवा पिढी दारूच्या आहारी जात आहे. एवढेच नव्हे तर शाळकरी मुलांचीही पावले तिकडे वळत आहे. हा गंभीर प्रकार थांबविण्यासाठी गावातील महिलांनी एकजूट केली आहे. दारू हद्दपार करण्यासाठी त्या एकत्र आल्या आहे. गावात होणारे लहानसहान तंटे, वाद होऊ नये यासाठी दारूबंदी-व्यसनमुक्ती आंदोलन समितीच्या महिलांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने दारूबंदी केली आहे. याला गावकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे. तरीही काही लोकांकडून दारू काढण्याचे प्रकार सुरू आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात येवती-धामक रस्त्यावर मांगलादेवी शिवारात २० पिपे मोहाचा माच टाकला होता. दिवाळीच्या दिवशीच दारू गाळून पाडव्याच्या दिवशी गावात विक्री करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु समितीच्या सक्रिय महिलांना या बाबीची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून याची खातरजमा केली. नेर पोलिसांनाही याची माहिती दिली. बीट जमादार राजेश चौधरी, महेश तडसे, रामधन आदी याठिकाणी दाखल झाले. मोहाचा माच असलेले वीसही पिपे रस्त्यावर आणून उबडून देत त्याची विल्हेवाट लावली. यावेळी पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, दारूबंदी व्यसनमुक्त आंदोलन समितीच्या महिलांची उपस्थिती होती. (वार्ताहर)