शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राळेगाव बाजार समितीचे शेतकरी हिताकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 15, 2015 01:44 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेतकऱ्यांनी या संस्थेकडे पाठ फिरविली आहे.

सेसचे नुकसान : कापूस व धान्याची होत आहे खुल्या बाजारात विक्रीराळेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हिताकडे दुर्लक्ष केले. परिणामी शेतकऱ्यांनी या संस्थेकडे पाठ फिरविली आहे. कापूस व धान्य खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जात आहे. मात्र या प्रकारातही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. राळेगाव, वाढोणाबाजार, वडकी येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस व धान्य खरेदी मोठ्या प्रमाणात खुलेआम सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर, वजन आणि चुकाऱ्यात संरक्षण मिळणे कठीण झाले आहे. वजनात फसगत, कमी दर आणि वेळेवर पूर्ण पैसा मिळेलच याची खात्री उरलेली नाही. बाजार समितीत धान्य व कापूस खरेदी सुरू झाली असली तरी बाहेर सुरू असलेली अवैध खरेदी रोखण्यासाठी समितीने आजपर्यंत एकदाही, एकाही प्रकरणात कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे खासगी खरेदीदारांचे चांगलेच फावले आहे. शिवाय या संस्थेचे सेसपोटी अतोनात नुकसान होत आहे. बाजार समितीच्या मार्केट यार्डवर पणन आणि सीसीआयची खरेदी दिवाळीपूर्वी सुरू व्हावी यादृष्टीने कोणतेही प्रयत्न झाले नाही. त्यामुळे या काळात अनेकदा हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी झाली आहे. मार्केट यार्डवर कापसाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांच्या जिनिंगमध्ये गाडी खाली करताना भाव कमी केला जात असल्याच्या तक्रारी राहिल्या आहे. हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला, पण बाजार समितीने स्वत:चा मोठा धर्मकाटा अद्यापही दुरुस्त केला नाही. त्यामुळे कापूस वाहनाचे वजन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना वजनाची वेळीच शहानिशा करून घेणे अशक्य झाले आहे. बाजार समिती शेतकरी हिताकडे दुर्लक्ष करत असल्याने आता सहकार विभागानेच या प्रकरणात लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबी मिळवून देण्यात याव्या, अशी मागणी करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)