शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

राळेगावात डॉक्टर, वकील, इंजिनिअर रिंगणात

By admin | Updated: February 13, 2017 01:21 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कंत्राटदार, शिक्षक, सहकार महर्षी, शिक्षणसंस्था संचालक आदींनी

के.एस. वर्मा  राळेगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत डॉक्टर, वकील, इंजिनिअर, कंत्राटदार, शिक्षक, सहकार महर्षी, शिक्षणसंस्था संचालक आदींनी विविध पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली आहे. डॉ. शशीकला भालचंद्र जवादे या एमडी, डीजीओ, स्त्रीरोग विशेषज्ञ आहेत. सर्वाधिक सुशिक्षित व वयस्कर (७० वर्षे) उमेदवार वडकी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसतर्फे लढत देत आहेत. त्यांचे पती डॉ. भालचंद्र जवादे (दिवंगत) यांनी सन ९२ ते ९७ या काळात वडकी गटातून प्रतिनिधित्व केले होते. नागपूर येथे सध्या वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असलेल्या डॉ. शशिकला या त्यांच्या पतीचा सामाजिक व राजकीय वसा पुढे चालविण्याकरिता निवडणूक रिंगणात आले असल्याचे सांगतात. जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड़ सीमा तेलंगे यांनी पाच वर्षे वरध जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिनिधीत्व केले, आता त्या जळका गटातून भाग्य अजमावत आहे. इंजिनिअर व कंत्राटदार अरविंद वाढोणकर वरध जिल्हा परिषद गटात काँग्रेसकडून उभे आहेत. येथेच वसंत सहकारी जिनिंग प्रेसिंगचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविणारे सहकार महर्षी चित्तरंजन कोल्हे भाजपातर्फे लढत देत आहे. किन्ही जवादे येथील साई पॉलिटेक्नीकचे संचालक संजय काकडे यांच्या पत्नी प्रीती काकडे भाजपतर्फे वडकी जिल्हा परिषदेतून निवडणूक रिंगणात आहे. राळेगाव येथील प्रथितयश डॉक्टर व इंजापूरचे मुळ निवासी डॉ. बाबाराव भोयर यांनी गत ५० वर्षात परिसरात दिवसरात्र ग्रामस्थांना सतत वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या या संपर्काच्या भरवशावर त्यांच्या सौभाग्यवती उषा भोयर यांनी जळका जिल्हा परिषद गटातून भाजपातर्फे उमेदवारी दाखल केली आहे. धानोरा गणातून भाजपातर्फे उमेदवारी दाखल करणाऱ्या स्रेहा विजय येणोरकर या २४ वर्षीय गृहिणी तालुक्यात सर्वाधिक कमी वयाच्या आहेत. विविध क्षेत्रात कार्यरत उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. प्रत्येक उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे.