शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

७३ दिवसांत १६ दिवस पाऊस

By admin | Updated: August 13, 2014 00:02 IST

गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात

महागाव : गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झालेल्या महागाव तालुक्यावर यंदा मात्र वरूण राजा रुसल्याचे दिसत आहे. पावसाच्या ७३ दिवसांत केवळ १६ दिवसच पाऊस कोसळला असून तालुक्यात आतापर्यंत २१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया असून शेतकरी हवालदिल झाले आहे. गतवर्षी महागाव तालुक्यात एकही दिवस असा जात नव्हता की पाऊस आला नाही. पावसाला थांब म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. सततच्या पावसाने शेतामधील पिके उद्ध्वस्त झाली होती. अनेक शेतात तर १५-१५ दिवस गुडघाभर पाणी होते. अतिवृष्टीने गतवर्षीचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. त्यानंतर रबी हंगामात गारपीट आली. यातही प्रचंड नुकसान झाले. यावर्षी सुरुवातीला हवामान खात्याने समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने मशागत करून पेरणीची तयारी केली. मात्र आकाशात ढग दिसतच नव्हते. मृग, रोहिणी, आर्द्रा आदी पावसाचे नक्षत्र कोरडे गेले. अशा स्थितीत धूळ पेरणी केलेले शेतकरी उद्ध्वस्त झाले. मध्यंतरी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र त्यांच्यावरही दुबार पेरणीची वेळ आली. आता तर गेल्या १५ दिवसांपासून तालुक्यात कुठेही पाऊस कोसळला नाही. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिके धोक्यात आली आहे. महागाव तालुक्यात गतवर्षी ५४ दिवसात १४०० मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा पाऊसच यायला तयार नाही. जुन-जुलै आणि आॅगस्ट अर्धा महिना निघून गेला. पावसाच्या ७३ दिवसांपैकी केवळ १६ दिवस पाऊस कोसळला. यामुळे तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया आहे. शेतातील पिके सुकली असून नदी-नालेही कोरडे आहे. या भीषण टंचाईचा फटका जनावरांनाही बसत आहे. हिरवा चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी हतबल दिसत आहे. पाणीपुरवठा योजनेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. महागाव शहराला दरडोई ४० लिटर पाणी याप्रमाणे तीन लाख लिटर पाण्याची गरज आहे. परंंतु एवढे पाणी उपलब्ध होत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून महागावची पाणीपुरवठा योजना बंद आहे. अशा स्थितीत पाऊस आला नाही तर काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने पाणी टंचाईचा कृती आराखडा उन्हाळ्यात मंजूर केला. मात्र त्यातील उपाययोजना करण्यातच आल्या नाही. (शहर प्रतिनिधी)