शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रबीची पेरणी संकटात

By admin | Updated: October 28, 2014 23:09 IST

ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.

नांदेपेरा : ढगाळ वातावरणामुळे वणी तालुक्यात रबीची पेरणी रखडली आहे. पेरणी रखडल्याने रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येण्याची शक्यता बळावली आहे.सध्या ढगाळ वातावरण कायम आहे. त्यातच पाऊसही येत आहे. त्यामुळे खरीपातील कपाशीवर मावा-तुडतुडे, पांढऱ्या माशीने हल्ला केला आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नाईलाजास्तव महागडी औषधी घेऊन पिके वाचवण्याकरिता फवारणी करावी लागत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडत आहे़ यापूर्वी पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीत ओलावा नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत हरभरा, गहू, जवस आदी रबी पिकांची पेरणी केली नाही.रबी हंगाम आता लांबणार आहे. पेरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ त्यामुळे रबी पिकाची पेरणी पूर्णपणे रखडली आहे़ ढगाळ वातावरणामुळे आता तरी पाऊस येईल, या आशेने काही शेतकऱ्यांनी जमीन पेरणीकरिता तयार करून ठेवली होती़ परंतु रिपरीप पावसामुळे उलट खरीप पिके दयनीय होत आहेत. सोबतच पीक विषाणूजन्य होत आहे़ त्यामुळे आॅक्टोबर महिना संपत आला तरी रबी पिकांची पेरणी झाली नाही़ परिणामी बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे़ वणी तालुक्यात गेल्या चार दिसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे़ या वातावरणामुळे सूर्य दर्शनही दुर्लभ झाले नाही़ वातावरणात थंडावा निर्माण झाल्याचा अनुभव येत आहे. मात्र ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये निरूत्साही परिस्थिती दिसून येत आहे. या वातावरणामुळे आजारातही वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. खरीप पिक संकटात असताना किमान रबी पिकापासून तरी लाभ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती़ मात्र रबी पिकही धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (वार्ताहर)