शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

रबी लागवडही अधांतरी

By admin | Updated: November 17, 2014 23:02 IST

ज्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती, त्याच नगदी आणि प्रमुख पिकांनी यावर्षी दगा दिल्याचे सुधारीत आणेवारी घोषित झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाने दगा दिल्याने

पुसद : ज्या पिकांवर शेतकऱ्यांची भिस्त होती, त्याच नगदी आणि प्रमुख पिकांनी यावर्षी दगा दिल्याचे सुधारीत आणेवारी घोषित झाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामाने दगा दिल्याने रबीच्या लागवडीचीसुद्धा सोय आता उरली नाही. आधीच्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँका पुन्हा कर्ज देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक खाईत गुरफटल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी सोयाबीनकडे पुसद परिसरातील शेतकऱ्यांचा कल गेल्या काही वर्षात वाढला होता. परंतु खरिप पिकाच्या सुधारीत आणेवारीने भयावह वास्तव उघडे पाडले. यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने पीक परिस्थिती नाजूक झाली. थोड्याफार प्रमाणात का होईना, शेतकऱ्यांना हातभार मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे. शासनाकडून आता किती व कधी मदत मिळते, कोणत्या सोयी-सुविधा मिळतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे आणि यावरच शेतकऱ्यांचे पुढिल नियोजन अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचे दिसून येत आहे. अतिशय परिश्रमाने खरीपपूर्व मशागत शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर लागवड, दुबार व तिबार पेरणीचे संकट सारे काही सोसल्यानंतरही हाती मात्र काहीच लागले नाही. मृग पावसाची प्रतिक्षा केली, परंतू रिमझिम, संततधार पावसाच्या हजेरीने पिकांची उगवण, वाढ, पोषण यावर परिणाम झाला. पिकांची हानी झाली, चारा तयार झाला नाही. पिकाला पोषक वातावरण भेटलेच नाही. पर्यायाने यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. पुसद कृषी उपविभागात सोयाबीनचा पेरा १ लाख ९३३ हेक्टर झाला. पुसद तालुक्यामध्ये ३३ हजार ६६ हेक्टरवर पेरणी झाली. दिग्रसमध्ये १३ हजार ८३० हेक्टर, उमरखेडमध्ये ३२ हजार ९८० आणि महागांवमध्ये २० हजार ६४७ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता. पुसद तालुक्यात भयावह चित्र आहे. पाणी, चारा, रोजगार आदी प्रश्नांनी नागरिकांची झोप उडाली आहे. शेतकऱ्यांचा खर्च खरीप पिकांतून निघाला नाही. नजरअंदाज आणेवारीवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर सुधारीत आणेवारी ४२ पैसे काढण्यात आली. १०० टक्के उत्पन्नाच्या जागी शेतीतून केवळ ४२ टक्के उत्पन्न झाल्याचे शासानाकडून अधिकृत सांगण्यात आले आहे. शेतीच्या बांधावर चित्र काही औरच आहे, अडीच क्विंटल बियाण्याला केवळ दोन क्विंटल उत्पादन निघाले आहे. पेरणी इतकेही उत्पादन मिळाले नाही. त्यात नंतरचा काढणीचा खर्च १५०० रुपये एकरी व मळणीयंत्रासाठी ३०० रुपये पोते मोजावे लागल्याने शेतकऱ्यांनी निघालेले सोयाबीन काढणीवाल्यांनाच दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. येणाऱ्या हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावे लागत आहे. जशी पिकांची स्थिती तशीच पाणी आणि चाऱ्याचीही टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अधांतरी आहे. शासनाकडून काढलेल्या सुधारीत आणेवारीहून डिसेंबर अखेरपर्यंत अंतीम आणेवारी ही ५० टक्केच्या आतच येण्याची दाट शक्यता आहे. पुसद उपविभागात दुष्काळस्थिती असल्याने संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. दुष्काळातून सावरण्यासाठी शासनस्तरावर लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)