शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

संघटित झाल्याशिवाय प्रश्न सुटत नाही

By admin | Updated: January 21, 2017 01:31 IST

शासन संख्याबळाला घाबरते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाज संघटित असणे आवश्यक आहे.

रावसाहेब दानवे : पुसद येथे विदर्भस्तरीय सोनार संमेलन पुसद : शासन संख्याबळाला घाबरते. त्यामुळे सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाज संघटित असणे आवश्यक आहे. अल्पावधीतच सोनार समाजाच्या सर्व शाखा संघटित झाल्या असून देशात ५५ लाख सोनार समाज आहे. समाजाने शासन दरबारी ज्या मागण्या मांडल्या आहे, त्या भाजपा सरकार पूर्ण करेल, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे दिले. आॅल इंडिया सोनार फेडरेशनच्यावतीने कांचनदास भगवंत वाढोणकर स्मृती सोनार जोडो अभियानांतर्गत पुसद येथे आयोजित सोनार समाज महासंमेलनात गुरुवारी ते बोलत होते. येथील गणेश मंगल कार्यालयात आयोजित सर्व शाखीय सोनार समाजाच्या या महासंमेलनाला पालकमंत्री मदन येरावार, फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर, भाजपाचे अ‍ॅड.नीलय नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, आशीष वाढोणकर उपस्थित होते. सर्वप्रथम समाजाचे आराध्य दैवत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सोनार समाजाच्यावतीने रावसाहेब दानवे, पालकमंत्री मदन येरावार, राष्ट्रीय अध्यक्ष मोहन हिवरकर यांचा आशीष वाढोणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील ज्येष्ठ बांधवांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.देवेंद्र शेरेकर यांनी केले. यशस्वीतेसाठी दिलीप महतकर, नारायण शेरेकर, गिरीष वाढोणकर, विलास अनासरे, सुभाष वेदपाठक, नामदेव सुवर्णकार, पारस देवपूरकर, राजेश पंडित आदींचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)