शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पूसचा कोल्हापुरी बंधारा कुचकामी

By admin | Updated: May 4, 2017 00:32 IST

शहरालगत वाहणाऱ्या पूस नदीवर बांधलेला कोल्हापुरी बंधारा कुचकामी ठरत असून उन्हाळ्यात या बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट आहे.

पाण्याचा ठणठणाट : महागाव सिंचन विभागाचे दुर्लक्ष महागाव : शहरालगत वाहणाऱ्या पूस नदीवर बांधलेला कोल्हापुरी बंधारा कुचकामी ठरत असून उन्हाळ्यात या बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. १३ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या बंधाऱ्याचा कोणालाही उपयोग होत नाही. सध्या महागाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आणि जलस्रोत वाढविण्यासाठी महागाव येथील कमळेश्वर संस्थाननजीक पूस नदीच्या पात्रात कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे उद्घाटन आमदार राजेंद्र नजरधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी नरवाडे, अनिल नरवाडे, नगरपरिषदेचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते. या कामावर १३ लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु पाणी थांबावे यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. बंधाऱ्याला नवीन प्लेट लावणे गरजेचे होते. परंतु बंधाऱ्यात जुन्याच प्लेटचा उपयोग करण्यात आला. यामुळे संपूर्ण पाणी वाहून गेले. कमळेश्वर पाणी वापर संस्थेचे काम होते त्या काळात या बंधाऱ्यात मोठा जलसाठा राहत होता. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होत होती. तसेच परिसरातील जलस्रोतातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध राहत होते. परंतु आता या बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. या प्रकरणाची तक्रार अनंता नागरजोगे यांनी केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाला भेट देत आहे. त्यांनी या कोल्हापुरी बंधाऱ्याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न पूस नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याचा उपयोग जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता. परंतु आता हा बंधारा कोरडा पडल्याने जनावरांना घेऊन पाण्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.