शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन तोडणाऱ्यांचा निषेध

By admin | Updated: July 11, 2016 02:18 IST

दादर (मुंबई) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तोडणारे गुंड आणि या प्रकाराला जबाबदार असलेले रत्नाकर गायकवाड ....

बौद्ध महासभा : घाटंजी तहसीलदारांना निवेदनघाटंजी : दादर (मुंबई) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तोडणारे गुंड आणि या प्रकाराला जबाबदार असलेले रत्नाकर गायकवाड यांना त्वरित अटक करावी या मागणीचे निवेदन तालुका भारतीय बौद्ध महासभेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या वास्तूमध्ये प्रिंटींग प्रेस सुरू केली, प्रबुद्ध भारत, मूकनायक, बहिष्कृत भारत यासारखी वृत्तपत्र चालवून जनजागृती केली, भारतीय राज्य घटनेचे लेखनसुद्धा याच वास्तूमधून केले ती पवित्र वास्तू नेस्तनाबूत करून आपणच ट्रस्टी आहोत, असा आभास निर्माण केला. आता ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा गायकवाड यांचा डाव आहे. या घटनेचा भारतीय बौद्ध महासभा, भारतीय बहुजन महासंघ, समता सैनिक दलाच्या तालुका शाखेने निषेध नोंदवून गायकवाड व त्यांच्या भाडोत्री गुंडांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन देताना सुनील नगराळे, एन.जी. भगत, रा.वि. नगराळे, प्रदीप गवळी, अजय खोब्रागडे, समाधान कानिंदे, संतोष ओंकार, संजय कांबळे, राजू खरतडे, मधुकर सातपुडके, प्रफुल्ल वनकर, गजानन राठोड, नितीन राठोड, बबिता मेश्राम, अनिल राठोड, वसीमभाई, अमीरभाई, अन्वरभाई, अरविंद भगत, तनवीरभाई, रफिकभाई आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)