शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

मनाच्या निर्मलतेने समाजाची प्रगती

By admin | Updated: May 24, 2016 00:14 IST

मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे.

मुनिश्री प्रतिकसागर महाराज : सर्वधर्म सत्संग महोत्सव यवतमाळ : मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे. त्यामध्ये बदल घडविणे काळाची गरज आहे. मनात निर्मलता निर्माण झाली तर आपोआपच समाजाची प्रगती होऊ शकते, असे विचार मुनिश्री प्रतिकसागर महाराज यांनी मांडले. येथील केसरिया भवनात आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. मुनिश्री प्रतिकसागर महाराज पुढे म्हणाले, मंदिरात बसून व्यापार करावयास लागलेल्या व्यक्तीच्या मनाची अवस्था बदलण्याची अवश्यकता आहे. शेवटी चांगले काय आणि वाईट काय, ही ठरविण्याची ताकद तुमच्या मनामध्ये आहे. परिवर्तन मनुष्याने स्वत: केले पाहिजे, तरच त्याच्या मनामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वाईट विचारांना, वाईट प्रवृत्तींना आपण मनाच्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवले तर ही गोष्ट तुमच्या चारित्र्यामध्येसुद्धा स्पष्ट दिसायला लागेल यात शंका नाही, असे ते म्हणाले. माणसात निर्माण झालेल्या अहंकाराविषयी विविध उदाहरणे देत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वात मोठा कोण, या प्रश्नाची उत्तरे पैशाने माणूस मोठा होतो, पैशाने माणसाची ओळख होते, पैशाशिवाय माणसाला विचारत नाही, अशी दिली जातात. तर कोणी सत्ताही माणसाला ओळख देते, सत्तेशिवाय माणसाची ओळख होत नाही, सत्ता सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगितले जाते. हीच ओळख आज समाजामध्ये दिली जाते. ही ओळख देताना माणूस अहंकार अंगिकारत आहे. यात तो लहान्याला प्रेम आणि मोठ्याला सन्मान देणे विसरून गेला आहे. मोठा कोण आणि त्या मोठेपणामध्ये अर्थ काय, असा प्रश्नही मुनिश्रींनी यावेळी उपस्थित केला.माणसाला अहंकाराने नष्ट केले आहे. रक्ताच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. बाहेरच्या व्यक्तींना जवळ केले जात आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे मुनिश्री म्हणाले. (वार्ताहर)