शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडात मोकाट गुरांची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:48 IST

ग्रामीण भागातील साईडपट्ट्या निकामी पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या नादुरुस्त झाल्या असून या साईडपट्ट्यांवर आता मोठ्या प्रमाणावर ...

ग्रामीण भागातील साईडपट्ट्या निकामी

पांढरकवडा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या नादुरुस्त झाल्या असून या साईडपट्ट्यांवर आता मोठ्या प्रमाणावर झाडे, झुडपे वाढली आहे. यामुळे वाहन चालवताना अनेकदा अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही झाडे, झुडपे कापून साईडपट्ट्या दुरुस्त करण्यात याव्या, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

पांढरकवडात वाहतुकीची कोंडी कायम

पांढरकवडा : शहरात जिथे जागा मिळेल तिथे वाहने उभी केली जात असल्याने तसेच रस्त्यावर अनेक दुकानदारांनी आपली दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीची कोंडी कायम राहत असल्याचे चित्र आहे. वाहतुकीची कोंडी ही बाब आता नित्याचीच झाली असून प्रशासनही याबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ओबीसी आरक्षणासाठी निदर्शने आंदोलन

वणी : केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणना कार्यक्रमात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी व भारतीय संविधानाच्या कलम २४३ (ड) (६) आणि कलम २४३ (ट) (६) मध्ये सुधारणा करून ओबीसी संवर्गाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये ओबीसी संवर्गाला २७ टक्के राजकीय आरक्षण राहील, अशी तरतूद करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांना घेऊन ओबीसी नेते डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात २२ सप्टेंबरला जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात येणार आहे. यात ओबीसी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन भालचंद्र चोपणे, विजय पिदुरकर, मोरेश्वर पावडे, देविदास काळे, गोविंद थेरे, गणपत लेडांगे, प्रा. टिकाराम कोंगरे, दिनकर पावडे, सुरेश बरडे, विवेकानंद मांडवकर, विलास मांडवकर, रवी देवाळकर यांनी केले आहे.