शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची दोन महिन्यांपूर्वी येथून बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर यवतमाळ जिल्हा परिषदेत परभणी येथील आशा गरूड यांची नियुक्ती झाल्यावरही त्या येथे रूजू झालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनाच प्राथमिक विभागाचाही प्रभार वहावा लागतो आहे.

ठळक मुद्देतक्रार निवारण सभा घेणार कोण? । नव्या शिक्षणाधिकारी येईना, माध्यमिकला भार पेलवेना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आठ हजार प्राथमिक शिक्षकांवर नियंत्रण ठेवणारा जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सध्या वाºयावर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या विभागाच्या नव्या शिक्षणाधिकारी येथे रूजू झालेल्या नाहीत. त्यामुळे पदोन्नती, एकस्तर, चटोपाध्याय वेतनश्रेणी, समायोजन अशा समस्या तुंबल्या आहेत. तर दर तीन महिन्यांनी तक्रार निवारण सभा घेण्याचे निर्देश असूनही ही सभाच होईनाशी झाली आहे.प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांची दोन महिन्यांपूर्वी येथून बदली झाली. मात्र त्यांच्या जागेवर यवतमाळ जिल्हा परिषदेत परभणी येथील आशा गरूड यांची नियुक्ती झाल्यावरही त्या येथे रूजू झालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांनाच प्राथमिक विभागाचाही प्रभार वहावा लागतो आहे. आधीच माध्यमिकच्या कामांचा पसारा वाढलेला असताना आता प्राथमिकचाही व्याप अंगावर आल्याने त्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.त्यातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या समस्या मात्र जैसे थे आहेत. अनेक सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असताना पदोन्नतीची प्रक्रियाच रखडली आहे. आरोग्य विभाग व इतर विभागातील पदोन्नत्या दरवर्षी होत असताना शिक्षण विभागातच संथगती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदी पदांसाठी शिक्षकांची तगमग सुरू आहे. मात्र विभागप्रमुखच नसल्याने प्रक्रिया आणखी लांबत आहे. विहीत सेवाकाळ पूर्ण करूनही आणि प्रस्ताव पाठवूनही अनेक शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ मिळालेला नाही. एकस्तर वेतनश्रेणीची अनेक प्रकरणेही प्रलंबित आहेत. काही ठिकाणी शालेय बांधकामाची ५ टक्के रक्कम अदा करण्यात आलेली नाही. शिक्षकांची वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह निधीची प्रकरणे मुदतीत मंजूर केली जात नसल्याची ओरड आहे. कमी पटाचे कारण देत बाभूळगाव तालुक्यातील काही शाळा बंद करण्यात आल्या होत्या. तेथे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन अद्यापही बाकी आहे.विभाग प्रमुखाअभावी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या तुंबत आहेत. जिल्ह्यात शिक्षकांची संख्या हजारोच्या घरात आहे. त्यांच्या समस्यांचीही जंत्री मोठी आहे. अशा समस्या सोडविण्यासाठी तीन महिन्यातून एकदा जिल्हा स्तरावर किंवा पंचायत समिती स्तरावर सभा घेण्याचा शासन निर्णय आहे. मात्र जिल्ह्यात अशी समस्या निवारण सभाच झालेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष वाढत आहे.शिक्षक बेमुदत धरणे आंदोलनाच्या तयारीतशिक्षण समितीत चर्चा होऊनही शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण होत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिक्षकांचे वेतन वेळेवर केले जात नाही. यासह अनेक समस्या प्रलंबित आहे. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाने १६ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांसह, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.संघटनांचा वचक संपलाजिल्ह्यातील शिक्षक संघटना निष्प्रभ झाल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेतील पदाधिकाºयांनाच अधिकारी जुमानत नसताना शिक्षक नेत्यांचे म्हणणे कोण ऐकणार, अशी स्थिती आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्या तुंबत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद