शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

कामगार कार्यालयात चक्क बोगस प्रमाणपत्रे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:28 IST

कामगार कार्यालयातील योजना लाटण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पावती पुस्तकांचा वापर कामगारांच्या नावाने दलालांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशी अनेक बोगस कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी सादर केली गेली.

ठळक मुद्देफौजदारी कारवाई होणार : कामगार नोंदणी व योजना लाटण्यासाठी असाही फंडा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कामगार कार्यालयातील योजना लाटण्यासाठी चक्क बोगस प्रमाणपत्र, स्वाक्षरी, पावती पुस्तकांचा वापर कामगारांच्या नावाने दलालांकडून होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशी अनेक बोगस कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी सादर केली गेली. या प्रकरणात कामगार कार्यालयाकडून पोलिसात तक्रारी करून संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ७३ हजार मजुरांची नोंदणी झाली आहे. यातील ५० हजार मजुरांना कीट वितरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासोबतच नवीन कामगारांच्या नोंदणी आणि नुतनीकरणाचे कामही सुरू आहे. याकरिता कामगार कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीत काही कामगारांकडे बोगस पुस्तके आढळली आहेत. बोगस पावतीबुक, त्यावर स्वाक्षऱ्या सापडल्या आहेत.यामुळे कामगार कार्यालय चक्रावून गेले आहे. १ आॅगस्ट २०१८ पूर्वी कामगाराची नोंदणी करणाºया कामगारांना पिवळे पुस्तके वितरित झाले. तर १ आॅगस्ट २०१८ नंतर कामगारांना पांढरे पुस्तके वितरित झाले. कॅम्पमधील कामगारांना पांढरे पुस्तके वितरित करण्यात आले होते. असे असले तरी कामगारांजवळ १ आॅगस्ट २०१८ नंतरच्या तारखेचे पिवळे पुस्तक आढळले. त्याचे नूतनीकरण करण्यासाठी कामगार हे पुस्तक घेऊन येत आहेत. कामगारांना ही पिवळी पुस्तके दिली कुणी, त्यांच्याजवळ डुप्लीकेट स्वाक्षरी असलेल्या पावत्या आल्या कशा, यासारखे अनेक प्रश्न कामगार कार्यालयापुढे निर्माण झाले. कर्मचाऱ्यांनी हा प्रकार जिल्हा कामगार अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणात जिल्हा कामगार अधिकाºयांनी फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.सोमवारी नोंदणी करण्यासाठी येणाºया मजुरींकडून पैसे उकळणारे एजंट शासकीय कार्यालयाच्या परिसरात आहे. अशांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने पत्र दिले आहे. यानंतरही पोलीस प्रशासनाने एजंटांवर कारवाई केली नाही. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरासह तालुक्यातही एजंटांचा सुळसुळाट आहे.ग्रामसेवकांकडून बोगस प्रमाणपत्रजिल्ह्यात कामगारांची संख्या कमी आहे. असे असले तरी कामगार कार्यालयात मजुरांची संख्या जास्त आहे. हे मजूर आले कुठून, हा खरा प्रश्न आहे. या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यानंतर ग्रामसेवक मजूर नसणाऱ्यां व्यक्तींना मजुराचे प्रमाणपत्र देत असल्याचा प्रकार उघड झाला.थेट कर्मचाºयांना धमक्याकामगार कार्यालयातील पुस्तक मिळावे आणि किट वितरित व्हाव्या म्हणून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून धमकावल्या जात आहे. याप्रकरणाची तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. यामुळे यात राजकीय हस्तक्षेप वाढण्याचा धोका वाढला आहे.बोगस कामगारांना रोखण्यासाठी स्पॉट व्हेरीफीकेशन केले जाणार आहे. या प्रकरणात ग्रामसेवकांनी हा मजूर आहे असे प्रमाणपत्र दिले आहे. यातील अनेक प्रमाणपत्र बोगस आहे. यामुळे ग्रामसेवक आणि बोगस मजुरांसह एजंटांवरही फौजदारी कारवाई होणार आहे.- राजदीप धुर्वेजिल्हा कामगार अधिकारी, यवतमाळ