शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलेची प्रसाधनगृहात प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST

ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना सोनोग्राफी व इतर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावे लागते. येथील सोनोग्राफी विभागात तपासणीसाठी महिलांना बराचवेळ वाट पहावी लागते. येथील सोनोग्राफी विभागाची यंत्रणा तुटपुंजी आहे. त्या तुलनेत तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच महिलांना अनेक वेळेस ताटकळत बसून रहावे लागते.

ठळक मुद्दे‘मेडिकल’मधील प्रकार : साडेपाच महिन्यांच्या गर्भवतीने मृत मुलाला दिला जन्म

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण तपासणी विभागात सोनोग्राफीसाठी आलेल्या साडेपाच महिन्याच्या गर्भवती महिलेची प्रसाधनगृहातच प्रसूती झाली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना सोनोग्राफी व इतर तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यावे लागते. येथील सोनोग्राफी विभागात तपासणीसाठी महिलांना बराचवेळ वाट पहावी लागते. येथील सोनोग्राफी विभागाची यंत्रणा तुटपुंजी आहे. त्या तुलनेत तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच महिलांना अनेक वेळेस ताटकळत बसून रहावे लागते. येण्या-जाण्याचा आर्थिक भुर्दंड सोसत नसल्याने नाईलाजास्तव महिला येथे बसून असतात.शुक्रवारी सोनोग्राफीसाठी आलेली महिला बराच वेळ बसल्यानंतर बाह्यरुग्ण तपासणी विभागातील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी गेली. महिला लघुशंकेला बसली असता काही कळायच्या आतच तिची त्या ठिकाणी प्रसूती झाली. साडेपाच महिन्याच्या गर्भाला तिने जन्म दिला. तो मुलाचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार माहीत होताच या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला या धक्कादायक घटनेची माहिती दिली. त्या महिलेला लगेच स्त्रीरोग विभागात दाखल करण्यात आले. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या अर्भकाचा पंचनामा केला. या प्रकरणी कुठलीही नोंद घेण्यात आली नाही. सदर महिलेची प्रकृती उत्तम असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.ग्रामीण महिलांची नेहमीच हेळसांडग्रामीण भागातील गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी तालुका स्तरावरील रुग्णालयात कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे बहुतांश महिलांना तपासणीकरिता जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे यंत्रणेवर क्षमतेपेक्षा अधिक ताण आल्याने हेळसांड होते.

टॅग्स :Medicalवैद्यकीय