शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बिझी, लुटारू रस्त्यावर

By admin | Updated: February 14, 2017 01:34 IST

पोलीस यंत्रणा निवडणूक कामात बिझी झाल्याचे पाहून लुटारू रस्त्यावर उतरले आहेत.

२४ तासात तीन मंगळसूत्र हिसकले यवतमाळ : पोलीस यंत्रणा निवडणूक कामात बिझी झाल्याचे पाहून लुटारू रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या २४ तासात मंगळसूत्र हिसकावल्याच्या तीन घटना उघड झाल्या आहेत. अशाच आणखी काही घटना घडल्या असण्याची परंतु पोलिसांपर्यंत तक्रारी न आल्याने त्या अद्याप गुलदस्त्यात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंगळसूत्र चोरीच्या पाठोपाठ घडलेल्या या घटनांनी महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांची ही मालिका पाहता ‘महिलांनो, सावधान’ असे म्हणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आर्णी रोडवरील राणाप्रताप गेटच्या आत मंगळसूत्र चोरीची घटना घडली. काळे ले-आऊटमधील गजानन महाराज मंदिरामध्ये भागवत सप्ताह सुरू आहे. तेथून एक महिला पायदळ परत जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंळसूत्राला झटका देऊन पळ काढला. या घटनेची राणाप्रताप गेट परिसरात चर्चा सुरू असताना अशीच दुसरी घटना गोधनी रोडवरील विदर्भ हाऊसिंग सोसायटी स्थित साई मंदिर परिसरात घडली. माळीपुरा येथील एक महिला टेलरिंगचा व्यवसाय करते. ती घरी येण्यासाठी निघाली असता सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी तिचे मंगळसूत्र हिसकले. या महिलेने लगेच पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. तत्पूर्वी रविवारी रात्री ८ वाजता मंगळसूत्र चोरीची एक घटना दारव्हा रोडवरील कोल्हे ले-आऊट नजीकच्या नवप्रभा कॉलनीमध्ये घडली. प्रेमिला विलास घुले या रात्री ८ वाजता घराच्या परिसरात शतपावली करीत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. पाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये खळबळ असली तरी शहराचे वरिष्ठ अधिकारी कार्यालय मात्र या तीनही घटनांबाबत अनभिज्ञ असल्याचे ‘लोकमत’ने संपर्क केला असता निदर्शनास आले. तीनही घटनांमधील गुन्ह्यांची पद्धत एक सारखीच आहे. गुन्ह्याचा वेळ हा सुद्धा सायंकाळी ७ ते ८ असाच आहे. ते पाहता या तीनही घटनांमागे एकच टोळी असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी) लुटारू जुने की नवे ?काही वर्षांपूर्वी यवतमाळात मंगळसूत्र चोरांच्या टोळीने उच्छाद मांडला होता. त्यांच्या कारवायांनी पोलीस अधीक्षक व महानिरीक्षकांचीही झोप उडविली होती. बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. या चोरीतील माल एका मटका व्यावसायिकाने पचविला होता. त्याला सुवर्ण व्यावसायिक व पोलीस दलातीलच काही भागीदारांची साथ असल्याचे उघड झाल्याने पुढे पोलिसांच्या तपासाची गती आपसुकच मंदावली होती. तीच टोळी आता पुन्हा सक्रिय झाली नाही ना असा संशय आहे.