शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवरील खड्डे उठले जीवावर

By admin | Updated: September 26, 2016 02:45 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते उमरखेड दरम्यान जीवघेणे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहन चालविताना

महागाव-उमरखेड रस्ता : अनेक अपघात, वाहनांचे नुकसानसंजय भगत  महागाव नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते उमरखेड दरम्यान जीवघेणे खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहन चालविताना वाहनधारकांच्या नाकीनऊ येत आहे. दररोज अपघात होत असून वाहनही नादुरुस्त होत आहे. परंतु या रस्त्याच्या डागडुजीकडे कुणाचेही लक्ष नाही. नागपूर-बोरी-तुळजापूर राज्य मार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. लवकरच हा रस्ता चौपदरी सिमेंटचा होणार आहे. परंतु हा रस्ता तयार होण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागणार आहे. अशा स्थितीत सध्या या रस्त्यावर प्रचंड मोठ्ठाले खड्डे पडले आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणावा की एखाद्या गावाचा पोचमार्ग म्हणावा, असा प्रश्न पडला आहे. महागावपासून पाच किलोमीटर अंतरावरील मुडाणा, निजधाम आश्रमासमोर भलामोठ्ठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. कित्येकांना अपंगत्व आले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. दुचाकी तर कसरत करून खड्ड्यातून बाहेर काढली जाते. परंतु चारचाकी वाहनांची फजिती होते. वाहनातील प्रवाशांचे होणारे हाल पाहून गावकरीही कासावीस होत आहे. समोर मोठ्ठा खड्डा आहे हे सांगण्यासाठी काही जण रस्त्याच्या बाजूने उभे असतात. नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचा कारभार थेट वर्धा येथून हाकला जातो. केंद्र सरकारने चौपदरीकरणाचे काम हाती घेतले असून त्याचाच बागुलबुवा करून रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे महागाव ते उमरखेड हा रस्ता पूर्णत: दुर्लक्षित झाला आहे. महागाव येथील पूस नदीवरील पूल एका बाजूने खचला आहे. नांदगव्हाण घाटातील रस्ता कडेने खचत आहे.