शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कालवा भूसंपादन मोबदल्यासाठी पायपीट

By admin | Updated: June 12, 2017 02:04 IST

आमडापूर प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त पायपीट करीत आहे.

आमडापूर प्रकल्प : उमरखेड एसडीओ कार्यालयाची दिरंगाईविश्वनाथ महामुने । लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : आमडापूर प्रकल्पाच्या कालव्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रकल्पग्रस्त पायपीट करीत आहे. उमरखेड उपविभागीय कार्यालयाच्या दप्तर दिरंगाईने शेतकरी हतबल झाले आहे.उमरखेड तालुक्यातील आमडापूर येथे सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या कालव्यासाठी महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीचा मोबदला आठ वर्षांपूर्वी मंजूर झाला. पाटबंधारे विभागाकडून संबंधित मोबदल्याची रक्कम उपविभागीय कार्यालयाकडे वळती करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मोबदलाच मिळाला नाही. सुरुवातीला धरणासाठी जमीन गेली. उर्वरित जमिनीचा तुकडा पुन्हा कालव्यासाठी संपादित करण्यात आला. परंतु कालव्याच्या जमीन संपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना अद्यापही मिळालाच नाही. महसूल प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे फुलसावंगी येथील प्रकल्पग्रस्त संतप्त झाले आहे. या शेतकऱ्यांनी महागाव तहसील कार्यालयावर मोर्चा आणला होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर कालवे तयार करण्यात आले. या प्रकल्पात लघुपाट क्र.४ आणि लघुपाटाच्या बांधकामाकरिता शेतकऱ्यांचा निवडा करून अवॉर्ड मंजूर करण्यात आले. मोबदल्याची ९० लाख ३६ हजार ६७४ रुपये रक्कम उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग पुसद यांनी उमरखेड उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आली. याला आता मोठा कालावधी लोटला आहे. शेतकऱ्यांच्या मोबदल्याची रक्कम उमरखेड कार्यालयात पडून आहे. परंतु ती रक्कम प्रकल्पग्रस्तांना देण्याचे सौजन्य या विभागाने दाखविले नाही. या मोबदल्यासाठी शेतकरी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. परंतु त्यांना अवाजवी त्रुट्या दाखवून वारंवार पूर्तता करण्यास भाग पाडले जात आहे. यामुळे आता आपणास मोबदला मिळणारच नाही, असे उद्गार अनेक शेतकरी काढत आहे.