शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शतकात पहिल्यांदाच पैनगंगा कोरडीठण्ण!

By admin | Updated: August 12, 2014 00:10 IST

दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे.

उमरखेड (कुपटी) : दरवर्षी आॅगस्ट महिन्यात पुरामुळे नदीकाठच्या गावांना तडाखा देणारी पैनगंगा यंदा कोरडी ठण्ण आहे. गेल्या १०० वर्षात पैनगंगा कधीच कोरडी पडली नव्हती, असे जुने जाणते सांगत आहे. पैनगंगेचे पात्र कोरडे असल्याने ५४ गावात पाणीप्रश्न निर्माण झाला असून जनावरांच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. उमरखेड तालुक्याची पैनगंगा जीवनदायिनीच आहे. दरवर्षी उन्हाळ्यापर्यंत या नदीचे पात्र खळखळत असते. परंतु यंदा लांबलेल्या पावसाने पैनगंगेचे पात्र कोरडे आहे. नदी तीरावर भांबरखेडा, जगापूर, तिवरंग, झाडगाव, हातला, मुळावा, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, बारा, संगम चिंचोली, मार्लेगाव, लिंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, हिवरा, कारखेड, देवसरी आदी ५४ गावे आहेत. या गावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरी पैनगंगेच्या तीरावर आहे. मात्र पैनगंगेचेच पात्र कोरडे असल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची छाया आहे. परंतु या भागातील लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. मानवासोबतच जनावरांनाही याचा फटका बसत आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेवून दिलासा देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)