शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वीज वितरणविरुद्ध उद्रेक

By admin | Updated: September 30, 2014 23:42 IST

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

महागाव तालुका : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटलामहागाव/बिजोरा : वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना विजेअभावी सिंचन रखडले आहे. यामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटत असून शेतकरी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकत आहे. महागाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचा पत्ता नाही. पोळ्याच्या आठवड्यात कोसळलेल्या पावसाने पिके जोमाने वाढत होती. मात्र आता उन्हाळ्यासारखे ऊन्ह तापत असल्याने पीक करपत आहे. अशा स्थितीत शेतकरी ओलित करण्यासाठी धडपड करीत आहे. मात्र वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ओलित करणे शक्य होत नाही. मुडाणा उपकेंद्रांतर्गत बिजोरा, कोठारी या परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून येथील शेतकरी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडकले. या ठिकाणी कोणताही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. चौकशी केली असता अधिकारी यवतमाळला असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकरी सहायक अभियंता कार्यालयावर धडकले. परंतु त्या ठिकाणीही अधिकारी हजर नव्हता. परंतु या ठिकाणी सवना येथील शाखा अभियंता झामरे उपस्थित होते. त्यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनीसुद्धा उडवाउडवीचे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी आणखी संतप्त झाले. सवना फिडरवरील गावे कोठारी फिडरवर का जोडण्यात आली, असा सवाल करण्यात आला. परंतु शेतकऱ्यांना समाधानकर उत्तरे देऊ शकली नाही. कोठारी, बिजोरा या ठिकाणी दोन ट्रान्सफार्मर उभे केले आहे. परंतु एकही कार्यान्वित केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलित करणे शक्य होत नाही. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी वारंवार विनंती करतात. परंतु कुणीही दखल घेत नाही. अशीच परिस्थिती महागाव तालुक्यातील करंजखेड जुने येथील आहे. येथील सिंगल फेजची डीपी गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. वारंवार विनंती करूनही उपयोग झाला नाही. काही दिवसापूर्वी तर शेतकऱ्यांनी मोर्चाही काढला होता. परंतु उपयोग झाला नाही. अद्यापही सिंगल फेज योजना सुरू झाली नाही. शेतातील डीपीवरूनच गावाला वीज पुरवठा केला जात आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होतो. गेल्या वर्षभरापासून शेतकरी त्रस्त झाले आहे. यावर उपाययोजना करावी म्हणून करंजखेडचे शेतकरी वीज वितरण कंपनीच्या महागाव कार्यालयावर पोहोचले. या ठिकाणी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रवीण ठाकरे, चेतन ठाकरे, शेषराव देशमुख, रमेश भांगे, किशोर अडकिने, सुभाष भांगे, अमित भांगे, नथ्थू भांगे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. परंतु या शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाही. अशीच स्थिती महागाव तालुक्यातील इतरही गावांची आहे. गावामध्ये वीज पुरवठा सुरळीत होत नाही. तसेच कृषी फिडरवरील परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू शकतो. परंतु वीज वितरण कंपनी कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)