शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

दारव्ह्यात भाजपाची विरोधी पक्षनेतेपदाची संधी हुकली

By admin | Updated: March 2, 2017 00:51 IST

नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चाललेल्या चढाओढीनंतर काँग्रेसच्या सारिका सचिन राऊत यांची ...

 नगराध्यक्षांचे रूलिंग : काँग्रेसच्या नगरसेविका सारिका राऊत यांची निवड दारव्हा : नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत चाललेल्या चढाओढीनंतर काँग्रेसच्या सारिका सचिन राऊत यांची विरोधी पक्षनेत्या म्हणून निवड करण्यात आली. या निवडीच्यावेळी फार वाद झाला नसला तरी नगरपरिषदेत सत्तेतील भागिदार सेना-भाजपाचे कुरघोडीचे राजकारण याहीवेळी पहायला मिळाले. भाजपाकडून या पदासाठी शुभम गवई यांचे नाव सुचविण्यात आले होते. परंतु सभेचे अध्यक्ष नगराध्यक्षांनी रूलिंगचा वापर करत भाजपा सत्तेत असल्याने या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद देता येणार नाही, असे सांगितले. त्यामुळे भाजपाची संधी हुकल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेत्याची निवड यासह विविध विषयाकरिता नवीन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. नगरपरिषदेत एकत्र येवून सत्ता स्थापन केल्यानंतर सभापती निवडीच्यावेळी या सत्ताधारी पक्षात वादाची ठिणगी उडाली. त्यानंतर या सभेमध्येही विरोधी पक्षनेत्याची निवड करताना या दोन पक्षामध्ये अद्याप फिलगुड नसल्याचे पाहायला मिळाले. या पदासाठी काँग्रसकडून प्रभाग-१ च्या नगरसेविका सारिका सचिन राऊत आणि भाजपाकडून प्रभाग-२ चे नगरसेवक शुभम गवई यांचे नाव सुचविण्यात आले होते. सभेच्या प्रोसेडिंगमध्ये दोन् ही प्रस्तावांची नोंद घेण्यात आल्यानंतर नगराध्यक्ष बबनराव इरवे यांनी नियमाचा आधार घेत भाजपा सत्तेत असून त्यांचा उपाध्यक्ष आहे. त्यामुळे या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देता येणार नाही, असे रूलिंग दिले. अध्यक्षांच्या या भूमिकेनंतर सारिका राऊत यांचा मार्ग मोकळा झाला. (तालुका प्रतिनिधी) कुरघोडीचे राजकारण, पक्षसंघर्षाची चिन्हे त्रक निवडणुकीनंतर सेनेचे आठ, भाजपा चार व एक अपक्ष अशी युती होवून सत्ता स्थापन झाली. त्यानंतर भाजपाकडे उपाध्यक्षपद देण्यात आले. मात्र काही दिवसातच झालेल्या सभापती निवडीच्यावेळी या दोन पक्षात वाद झाला. सेनेने समाजवादी पार्टीला सत्तेत सहभागी करून घेतल्याबद्दल भाजपाने सभापती निवडीच्यावेळी स्वत:ला दूर ठेवले आणि आता विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीतसुद्धा कुरघोडीचे राजकारण झाल्याने या पक्षामधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहे.