शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईने जलयुक्तचे पितळ उघडे

By admin | Updated: April 20, 2017 00:32 IST

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे पितळ पाणीटंचाईने उघडे पाडले आहे.

पुसद व उमरखेड उपविभाग : पावसाळ्यात तुडुंब दिसणारे प्रकल्प कोरडे ठण्ण पुसद : शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे पितळ पाणीटंचाईने उघडे पाडले आहे. पावसाळ्यात तुडुंब झालेल्या शेततळ्यासह सर्व तलाव आता कोरडे ठण्ण पडले आहे. गावागावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलयुक्तशिवार योजनेच्या कामांची चौकशी झाल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते. पुसद आणि उमरखेड उपविभागातील चारही तालुक्यांमध्ये पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली होती. महसूल, जिल्हा परिषद, वन विभाग, कृषी, पाटबंधारे आदी विभागांच्या माध्यमातून ठिकठिकाणी जलयुक्तशिवारची कामे करण्यात आली होती. शेततळे, शेतीबांध, कालवे, ढाळीचे बांध, नाले खोलीकरण, नदीवर बंधारे, विहिरींचे खोलीकरण आदी शेकडो कामे करण्यात आली. यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. पावसाळ्यात तुडुंब भरलेल्या या कामांचे छायाचित्र प्रकाशित करून प्रत्येक विभागाने आपली पाठही थोपटून घेतली होती. उन्हाळ्यात पाणीटंचाईवर मात होईल, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. मात्र या कामांचा दर्जा कुणीही तपासला नाही. हिवाळा लागताच या जलयुक्तच्या कामातील फोलपणा उघड होऊ लागला. उन्हाळ्यात तर जलयुक्तच्या कामाचा बोजवाराच उडाल्याचे दिसून आले. चारही तालुक्यात झालेली कामे कंत्राटदारांनी कशा पद्धतीने केली, हे सर्वश्रृत आहे. सध्या पुसद आणि उमरखेड उपविभागातील गावागावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पैनगंगा आणि पूस नदी कोरडी पडल्याने दोनही नदीच्या तीरावरील हजारो नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. उमरखेड तालुक्यात तर मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली होती. परंतु आता या तालुक्यातच सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महागाव तालुक्याचीही अशीच अवस्था आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भागात मोठ्या प्रमाणात जलयुक्तची कामे झाल्याचा दावा करण्यात आला. परंतु माळपठारावर आता निर्माण झालेली पाणीटंचाई या कामाची गुणवत्ता सिद्ध करीत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चारही पंचायत समितींनी कृती आराखडा तयार केला आहे. गतवर्षीच्या गावांची नावे आणि यंदाच्या कृती आराखड्यात असलेल्या गावांची नावे अपवाद वगळता सारखीच आहे. जलयुक्त शिवारची कामे झालेली गावेही पाणीटंचाईच्या यादीत दिसत आहे. काही गावात तर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. दरवर्षी पाणीटंचाईच्या नावाखाली लाखो रुपये उधळल्या जातात. परंतु तीच ती गावे पाणीटंचाईच्या यादीत दिसून येतात. जलयुक्तशिवारच्या कामानंतर ही गावे टंचाईमुक्त होतील, अशी अपेक्षा एप्रिल महिन्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईने फोल ठरविली. (कार्यालय चमू)