शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ४८ टक्के जलसाठा

By admin | Updated: August 26, 2014 23:43 IST

वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे.

पाणी जपून वापरा : वार्षिक सरासरीच्या ४१ टक्केच पाऊसयवतमाळ : वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस यंदा झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उपलब्ध पाणी जपून वापरण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकांवर आली आहे. अन्यथा आगामी उन्हाळ्यात शहराला आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ प्राधिकरणावर येण्याची चिन्हे आहेत. जून, जुलै व आॅगस्ट हेच खरे पावसाळ्याचे महिने आहेत. परंतु या महिन्यातच जिल्ह्यात पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ९११ मिमी आहे. परंतु आता आॅगस्ट संपायला आला आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४१ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील कोणतेही धरण अद्याप ओव्हर-फ्लो झाले नाही. ऐरव्ही ऐन जुलैच्या मध्यातच सर्व धरणे ओव्हर-फ्लो झाल्याचे छायाचित्र सर्वत्र झळकतात. यावर्षी मात्र अद्यापही ही स्थिती आलेली नाही. पावसाचा मंदावलेला वेग लक्षात घेता यावर्षी धरणे ओव्हर-फ्लो होणार की नाही याबाबतच साशंकता आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात केवळ ४८ टक्के तर चापडोह धरणात केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण भरायला आणखी ५० टक्के पावसाची आवश्यकता आहे. एरव्ही मे-जूनमध्ये पाणी कपात करणाऱ्या जीवन प्राधिकरणावर यावेळी ऐन पावसाळ्यात पाणी कपात करण्याची वेळ आली आहे. सध्याच चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार याची चिन्हे आताच दिसू लागली आहे. सध्या धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा राखून ठेवणे, पाण्याची बचत करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज प्रशासनात निर्माण झाली आहे. नागरिकांनीही पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे. यंदा पावसाळा कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने फारपूर्वी वर्तविला होता. मात्र त्या दृष्टीने प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाही. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाऊ नये म्हणून प्रशासनाने अथवा लोकप्रतिनिधींनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. त्याचा परिणाम नागरिकांना भोगावा लागणार आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व नागरिकांनी संयुक्त प्रयत्न केल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करून भविष्यातील पाणीटंचाईच्या अडचणीवर तोडगा काढता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची प्रतीक्षा आहे. (शहर वार्ताहर)