शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

जल प्रकल्पात केवळ १८ टक्के पाणीसाठा

By admin | Updated: May 31, 2014 00:11 IST

सूर्य आग ओकत असल्याने असह्य उन्ह तापत असून याचा परिणाम जिल्ह्यातील जल प्रकल्पांवर होत आहे. जल प्रकल्पातील पाण्यात सपाट्याने घट होत असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे.

उन्हाचा परिणाम :  सहा लघु प्रकल्प कोरडेयवतमाळ : सूर्य आग ओकत असल्याने असह्य उन्ह तापत असून याचा परिणाम जिल्ह्यातील जल प्रकल्पांवर होत आहे. जल प्रकल्पातील पाण्यात सपाट्याने घट होत असून जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा आहे. सहा प्रकल्प तर कोरडे पडले आहे.मे अखेरीस सूर्य आग ओकायला लागला. पारा ४३ अंशाच्या घरात आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठय़ा प्रमाणात होत आहे. यातून प्रकल्पातील पाण्यात कमालीची घट नोंदविली जात आहे. गत १५ दिवसात तीन लघु प्रकल्प पुन्हा कोरडे पडले आहे. आता कोरडे पडलेल्या प्रकल्पाची संख्या सहा झाली आहे. जिल्ह्यातील मोठय़ा व मध्यम प्रकल्पाच्या पाणी पातळीतही घट नोंदविली जात आहे. पावसाळा लांबला तर प्रकल्प कोरडे पडण्याचा धोका आहे. जिल्ह्यातील लोहतवाडी, नेर, दुधाणा, बोर्डा, अंतरगाव आणि पहूर इजारा हे प्रकल्प कोरडे पडले आहे. तर इतर प्रकल्पामध्ये २१.५९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. या साठय़ाची टक्केवारी १८.४४ टक्के आहे. जिल्ह्यातील मोठय़ा पूस प्रकल्पात २१.८१ दलघमी पाणी आहे. या ठिकाणी जल प्रकल्पाच्या क्षमतेच्या तुलनेत २७ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पांची स्थितीही चिंताजनक आहे. गोखी प्रकल्पात ११.५७ दलघमी, वाघाडी प्रकल्पात ११.९२ दलघमी, सायखेडा प्रकल्पात ११.३३ दलघमी, लोअरपूस प्रकल्पात ३५.८४ दलघमी आणि बोरगाव प्रकल्पात २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  तळपत्या उन्हाळामुळे पाण्यात मोठी घट होत आहे. यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या निळोणा आणि चापडोह प्रकल्पही तळाला लागले आहे. पावसाळा लांबल्यास शहराच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)