शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ ११ टक्के पीककर्ज वाटप

By admin | Updated: May 31, 2014 00:12 IST

जिल्हय़ात ८ लाख ४0 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना १ हजार ५८९ कोटी पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. यापैकी केवळ ११ टक्के वाटप झाले आहे.

यवतमाळ : जिल्हय़ात ८ लाख ४0 हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांना १ हजार ५८९ कोटी पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले होते. यापैकी केवळ ११ टक्के वाटप झाले आहे. यामध्येही जिल्हा मध्यवर्ती बॅंक व विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बॅंक यांनीच सर्वाधिक कर्जवाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांनी शेतकर्‍यांची निराशा केली आहे. कर्जवाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी सर्वाधिक वाटा हा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा आहे. या बॅंकेने ६00 कोटींचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते. मात्र एवढी तरतूद नसल्याने ४00 कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे. यापैकी ५0 टक्के रक्कम म्हणजे २00 कोटींचे कर्ज शेतकर्‍यांमध्ये वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बॅंकाकडून कर्ज वितरणात मिळत असलेला अल्प प्रतिसाद डोकेदुखी ठरत आहे. याच मुद्यावर जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखानिहाय कर्जवाटपाचा आढावा घेण्यासाठी ३ जून रोजी बैठक बोलावली आहे. खरीप आढावा बैठकीत मुंबई येथे जिल्हय़ातील स्थितीबाबत उहापोह करण्यात आला. जिल्हय़ाला मागच्या वर्षी बियाणे कंपन्यांनी ५३ टक्के सोयाबीन बी उपलब्ध करून दिले होते. तर ४३ टक्के बियाणे शेतकर्‍यांनी स्वत:कडचे वापरले होते. मात्र यावर्षी महाबीज व बियाणे कंपन्या यांनी योग्य पुरवठा केला नाही. शिवाय शेतकर्‍यांकडे असलेल्या सोयाबीनचीही उगवण शक्ती तपासली जात आहे. या बैठकीमध्ये कृषीपंपाच्या वीज जोडणीचे पैसे भरूनही प्रस्ताव रखडले आहे. हे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना देण्यात आले. याशिवाय खताच्या उपलब्धतेबाबतही विचारणा करण्यात आली. युरियाची एका विशिष्ट काळातच अचानक मागणी वाढत असल्याचे सांगण्यात आले. याबाबत खत व्यवस्थापन समितीकडे सूचना देण्यात आल्या. जिल्हय़ाला यावर्षी कृषी उत्पन्नात दहा टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी सांगितले.  (कार्यालय प्रतिनिधी)