शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील एक हजार २० गावे सरकारी नाेंदीअभावी भरपाईपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:42 IST

Yawatmal News शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शासकीय निकषामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे.

ठळक मुद्दे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही मदतीवर प्रश्नचिन्हप्रशासनाकडून स्वतंत्र अहवाल

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जून ते ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात अती पावसाने कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले. प्रत्यक्षात यातील निम्म्यापेक्षा कमी गावांची नोंद नुकसानीच्या अहवालात करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एक हजार २० गावे मदतीला मुकण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असताना शासकीय निकषामुळे निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र अहवाल राज्याच्या कृषी विभागाकडे पाठविला आहे. यामध्ये नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, यातील निकष शिथील करण्यात यावे, असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात राज्य शासन त्यावर काय निर्णय घेते, या संपूर्ण बाबीवर शेतकऱ्यांची मदत विसंबून राहणार आहे. सद्यस्थितीत ३४ हजार ८०८ हेक्टरसाठी २४ कोटी मागणी करण्यात आली आहे.

३४ हजार हेक्टरचे नुकसानजून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जिल्ह्यातील दोन हजार १५९ गावांनाही अती पावसाचा फटका बसला आहे. प्रत्यक्षात यातील मोजकीच गावे प्रशासनाच्या अहवालात नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात तर अतिवृष्टीच्या निकषामध्ये तीन महसूल मंडळ नोंदविण्यात आले आहे. यामध्ये दारव्हा तालुक्यातील मांगकिन्ही, दारव्हा आणि दिग्रस महसूल मंडळाचा समावेश आहे. या तीन महसूल मंडळात केवळ ६० गावे आहेत. तर जून ते सप्टेंबरच्या अहवालात १६ तालुके नुकसानीत दाखविण्यात आली आहे. मात्र त्यामध्ये गावाचा उल्लेख नाही. या चार महिन्यात केवळ दहा हजार हेक्टरचेच नुकसान झाल्याची नोंद महसूल प्रशासनाच्या लेखी करण्यात आली आहे.

दोन हजार १५९ गावांना मदतीची अपेक्षामदत वाटपासाठी शासनाने निकष जाहीर केले. यामुळे जिल्ह्यातील दोन हजार १५९ गावातील सहा लाख शेतकरी मदतीसाठी अपात्र ठरणार आहे. या सर्वच शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

जून ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरचे नुकसान झाले. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने २४ कोटी २७ लाख रुपयांची मागणी केली आहे. इतर नुकसानग्रस्त गावांसाठी मार्गदर्शन मागविले आहे.- एम.डी. सिंह,जिल्हाधिकारी, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती