शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दरकरार बंद पद्धतीचा निर्णय एकतर्फी

By admin | Updated: December 17, 2015 02:32 IST

शासनाने लघुउद्योगांसाठी राखिव असलेल्या वस्तुंचे आरक्षण संपुष्टात आणून दरकरार पद्धत बंद करण्याबाबत ...

यवतमाळ : शासनाने लघुउद्योगांसाठी राखिव असलेल्या वस्तुंचे आरक्षण संपुष्टात आणून दरकरार पद्धत बंद करण्याबाबत एकतर्फी निर्णय घेऊन लघु उद्योगांवर अन्याय केल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे. लघु उद्योग विकास महामंडळाची स्थापना १९ आॅक्टोंबर १९६२ रोजी करण्यात आली. लघुउद्योगातून निर्मित वस्तुंना बाजारपेठ मिळवून देणे हा त्यामागिल मुख्य हेतू होता. त्या अनुषंगाने शासनाने दोन जानेवारी १९९२ च्या शासन निर्णयामध्ये लघुउद्योगांसाठी स्टिल फर्निचर, संगणक फर्निचर, एअर कुलर, पीव्हीसी पाईप, पॉलिथिन पिशव्या, आरसीसी पाईप या व लघुउद्योगांद्वारा निर्मित इतर वस्तू खरेदीसाठी आरक्षित केल्या होत्या. त्या आरक्षणाच्या आधारे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाद्वारे दरकराराची प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत होती. त्याद्वारे न्यूनतम दरानुसार लघुउद्योगांकडून स्विकृती मिळवून अंतिम दर ठरत होता. त्यानुसार संपूर्ण राज्यभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना दरकरारानुसार साहित्याचा पुरवठा करण्यात येत होता. मागिल पाच वर्षांपासून महामंडळाद्वारे इ टेंडरिंगची प्रक्रिया राबविण्यात येत होती व लघुउद्योगांकडून साहित्याचे नमुने मागवून त्याची त्रयस्त संस्थेकडून तांत्रिक तपासणी करून अहवाल मागविण्यात येत होता. त्यानुसार संपूर्ण प्रक्रिया होऊन दरकरार अस्तित्वात येत होता. सद्यस्थितीत लघुउद्योग हा बँकेकडून कर्ज घेऊनच सुरू झालेला असतो. तसेच लघुउद्योगांमध्ये कार्यरत कामगार या उद्योगांवरच अवलंबून असते. राज्याच विचार केल्यास लघुउद्योगांवर आज चार हजारांहून अधिक कामगार अवलंबून आहेत. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी इ निविदा प्रणालीद्वारे दर मागविले होते. संपूर्ण प्रक्रिया पार पडली. परंतु नंतर मात्र शासनाने यावर स्थगिती आणली. शिवाय लघुउद्योगांसाठी राखिव असलेल्या वस्तुंचे आरक्षण संपुष्टात आणून दरकरार पद्धत बंद करण्याबाबत मंत्रीमंडळाच्या १४ आॅक्टोबर २०१५ च्या बैठकीत एकतर्फी निर्णय घेऊन लघुउद्योगांवर अन्याय केल्याचा आरोप यवतमाळ येथील ओंकार इंडस्ट्रिजचे संचालक कलिंदरसिंग मानकू यांनी केला आहे. एकीकडे शासन बंद उद्योगांचे पुनर्जीवन करीत आहे तर दुसरीकडे सुरू असलेले लघुउद्योग बंद पाडत आहे. लघुउद्योगांना सापत्न वागणूक मिळत असल्याचाही आरोप उद्योजकांमधून होत असून याबाबत अधिवेशनात विस्तृत चर्चा होऊन लघुउद्योगांना दिलासा द्याव्या अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)