शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनात सापडले एक लाख

By admin | Updated: November 24, 2015 05:37 IST

वणी ते चिखलगाव मार्गावर एका विना क्रमांकाच्या कारमधून पोलिसांनी रोख एक लाख १५ हजार रूपये जप्त केले. ही घटना

वणी : वणी ते चिखलगाव मार्गावर एका विना क्रमांकाच्या कारमधून पोलिसांनी रोख एक लाख १५ हजार रूपये जप्त केले. ही घटना शनिवारी घडली. दोन दिवसानंतर सोमवारी या घटनेची माहिती देण्यात आली. शहरातून यवतमाळकडे जाणाऱ्या मार्गावर चिखलगाव आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. शनिवारी लालपुलिया परिसरात भर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास यवतमाळकडून चंद्रपूरच्या दिशेने एक पांढऱ्या रंगाची आणि विना क्रमांकाची इनोव्हा गाडी धावत होती. ही गाडी अगदी सुसाट वेगाने जात होती. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक दीपक पवार व डीबी पथकाचे सुधीर पांडे गस्तीवर होते. त्यांना या वाहनाचा संशय आला. त्यामुळे त्यांनी गाडीला अडविण्याचा प्रयत्न केला.पोलिसांना बघून वाहन चालकाने पुन्हा भरधाव वेगाने गाडी हाकली. हे वाहन सुसाट वेनागे वणीकडे निघाले. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून चिखलगाव परिसरातील एका ट्रान्सपोर्ट कार्यालयासमोर वाहनाला कसेबसे अडविले. या वाहनाची तपासणी केली असता चालकाजवळ वाहनाचे कोणतेही कागदपत्र आढळले नाही. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता डिकीमध्ये १०० रूपयांचे १२ नोटांचे बंडल आढळले. त्यात एक लाख १५ हजार रूप्ये होते. पोलिसांनी याबाबत चालक चंद्रकांत मुकींदा टेकाम (३०), राजेंद्रनगर, वॉर्ड क्र. एक, बल्लारपूर (जि.चंद्रपूर) याला विचारण केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही. अखेर पोलिसांनी पाच लाख किंमतीच्या ईनोव्हाला (क्रमांक एम.एच. ३१-सी.एन.८९३९) ताब्यात घेऊन वाहन चालकाविरूद्ध कलम ४१ (१) (४) गुन्हा दाखल केला. वाहनातील पैसे जप्त करण्यात आले. लालपुलिया परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा व्यापार चालतो. या परिसरात अनेक कोळसा डेपो तआहेत. त्यात काही अवैध डेपोंचाही समावेश आहे. त्यामुळे हे पैसे कोळसा व्यापाऱ्यांच्या देवाण-घेवाणीसाठी आले असावे की काय ?, अशी शंकता उप्स्थित होत आहे. सोबत अनुचित प्रकारातून अवैध पद्धतीने पैसा बाहेर गावी जात असावा, अशीही चर्चा आहे. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक पुढील तपास करीत आहे. दरम्यान शनिवारीच टिळनगरमध्ये धाडसी घरफोडी झाली. चोरट्यांनी दोन लाख ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घरफोडीत आरोपी अद्याप गवसले नाही. त्यानतंर त्याच दिवशी नेमका त्याच वेळी लालपुलिया परिसरात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. (प्रतिनिधी)