शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखांवर कृषिपंपांना मिळणार १२ तास वीज

By admin | Updated: September 9, 2016 02:38 IST

कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची अंमलबजावणी सुरूयवतमाळ : कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची जिल्ह्यात वीज महावितरण कंपनीने गुरुवारपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र सध्या तरी आठवड्यात तीन ते चारच दिवस दिवसा वीज देणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात आले. पावसाने दडी मारल्यामुळे पिके धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील तीन महिने राज्यात दररोज सलग बारा तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उर्जामंत्र्यांनी मंगळवारी घेतला. या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना देण्यात आले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातही शेतीला बारा तास वीज पुरवठा निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली.याचा फायदा जिल्ह्यातील एक लाख पाच हजार २२ कृषीपंपांना होणार आहे. जिल्ह्याला लागणाऱ्या एकूण वीजेच्या २० ते २२ टक्के वीज ही कृषीपंपांना लागते. यासाठी पूर्वी रात्री असणारे वेळापत्रकही बदलले असून आता रात्री ११.३० ते सकाळी ११.३० आणि सकाळी ११.३० ते रात्री ११.३० असे नवीन बारा-बारा तासांचे वेळापत्रक केले आहे. वीज पुरवठा करताना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास दुसऱ्या दिवशी तेवढा वेळ वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजे बारा तांसाऐवजी तांत्रिक अडचणीमुळे दहा तासच आज वीज पुरवठा करण्यात आला तर उद्या दोन तास वाढवून चौदा तास वीज पुरवठा अशा भागात करण्यात येणार आहे. तसेच काही भागात वीज पुरवठ्यामध्ये अडचण आल्यास अशावेळी गावठाण फिडरवर भारनियमन केले जाईल. याबाबतचे सर्व अधिकार त्या-त्या परिसरातील कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. दर तासाला रिडींग घेण्यात येणार असल्याने कुठे किती वीज लागत आहे, याची माहिती मिळेल. यवतमाळ जिल्ह्यात सध्या जवळपास दोन लाख हेक्टर जमिन सिंचनाखाली आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार वीज पुरवठा करण्यात आल्यास २५ टक्के जमिनीवर सिंचन होईल. यामध्ये खरीप पिकांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी) रात्रीचे शेड्यूल राहीलचमुख्यमंत्र्यांनी शेतीला बारा तास अखंड वीज पुरवठा आणि तोही सकाळी साडेपाच ते सायंकाळी साडेपाच या वेळात करण्याची घोषणा केली. जेणेकरून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रात्रभर शेतात जागावे लागू नये. परंतु महावितरणकडून या वेळापत्रकाला सध्या तरी खो दिल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांनी साडेअकरा ते साडेअकरा असे वेळापत्रक सध्या सांगितले आहे. आठवड्यातील चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसाने किंवा तीन दिवस रात्री आणि चार दिवस दिवसाने हे वेळापत्रक राबविले जाईल. आठवडाभर दिवसानेच वीज देणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते.