शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

इंझाळाच्या रॉयल्टीवर एकलासपुरात रेती उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:49 IST

एका घाटाच्या रॉयल्टीवर दुसऱ्या घाटातील रेतीचा उपसा करण्याचा प्रकार वर्धेत नवा नाही. असाच प्रकार पुलगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला आहे.

ठळक मुद्देपाच जणांना अटक : ३२.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑनलाईन लोकमतपुलगाव : एका घाटाच्या रॉयल्टीवर दुसऱ्या घाटातील रेतीचा उपसा करण्याचा प्रकार वर्धेत नवा नाही. असाच प्रकार पुलगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाला आहे. येथे इंझाळा येथील रेती घाटाच्या रॉयल्टीरवर एकलासपूर येथील रेती घाटावरून रेतीचा उपचार करणाºया पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.रेती माफीयाला आवळण्याकरिता पोलीस विभागाला विशेष अधिकार दिले असतानाही केवळ महसूल विभागाकडून सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारामुळे त्याला आळा घालणे अवघड जात आहे. हाच प्रकार सुरू असल्याच्या माहितीवरुन पुलगाव पोलिसांनी कारवाई करीत तब्बल पाच जणांना अटक केली आहे. मौजा एकलासपूर येथील ईदगाह जवळील वर्धा नदीच्या पात्रातून काही जण रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दुधकोहळे, जमादार विवेक बनसोड, राजू कुरसंगे, प्रदीप सहाकाटे, रूपेश रघाटाटे, सैनिक कापसे आणि वाहन चालक प्रशांत मौजे यांची या घटावर छापा टाकला.येथे संतोष थीकमचंद पनपालिया रा. नाचणगाव याने इंझाळा येथील वाळू साठाधारक शकील खान रा. पुलगाव याच्या मदतीने संगनमत करून इंझाळा येथील वाळू साठ्याच्या रॉयल्टीवर मौजा एकलासपूर येथील वर्धा नदीचे पात्रातील वाळुची चोरी केली. या रेतीचा ईदगाहजवळ अवैध साठा करून वाळुची चोरटी वाहतूक करताना पाच जणांना अटक करण्यात आली. यात जप्त केलेली रॉयल्टीही खोटी असल्याचे दिसून आले.यावरून पोलिसांनी संतोष भिकमचंद पनपालिया (४०) रा.नाचणगाव, टिप्पर चालक रमेश देविदास चौधरी (५०) रा. किरण नगर, अमरावती, मंगेश मनोहर फेंडर (२७) रा. तळेगाव (दशासर), शेख ईमरान शेख मन्नान (२७), रा. मांजरखेड, अमरावती, शंकर रमेश अनोले (३३) रा. वडाळी या पाच जणांना अटक केली. या कारवाईत जेसीबी क्रमांक एमएच ३२ पी ५६४७ किंमत २० लाख रुपये, टिप्पर क्र. एमएच १२ सिटी ९५०८ किंमत ३ लाख, टिप्पर क्रमांक एमएच ०४ डीडी ८२८६ किंमत ३ लाख रुपये, टिप्पर क्र. एमएच ०२ वायए ९११८ किंमत ३ लाख, टिप्पर क्रमांक एमएच २७ बिएक्स ०६४५ किंमत ३ लाख व १६ ब्रास वाळू किंमत १६ हजार असा एकूण ३२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३७९, ३४, १८८ भादंवि सहकलम १३०/१७७, ३(१)१८१ मोवाका गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांनी केली.