शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कळंब येथील प्रशासकीय इमारतीचे अधिकाऱ्यांना वावडे

By admin | Updated: May 26, 2017 01:16 IST

तालुक्यातील नागरिकांना सोयीचे व्हावे, म्हणून सर्व प्रशासकीय विभागाचा कारभार एकाच इमारतीतून

केवळ तहसील कार्यालय सुरू : वरिष्ठांनी दखल घेण्याची गरजगजानन अक्कलवार । लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : तालुक्यातील नागरिकांना सोयीचे व्हावे, म्हणून सर्व प्रशासकीय विभागाचा कारभार एकाच इमारतीतून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी कळंब येथे प्रशासकीय इमारत उभारण्यात आली. आमदार डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इमारतीचे लोकार्पणही केले. परंतु तहसील कार्यालय वगळता इतर कार्यालय प्रमुखांनी या इमारतीत येण्यास टाळाटाळ चालविली आहे. त्यामुळे नागरिकांना इतर कार्यालयाच्या चकरा मारताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेली ही प्रशासकीय इमारत धूळखात पडली आहे. सध्याच्या स्थितीत कळंब शहराच्या वेगवेगळया भागात शासनाच्या विविध विभागाची कार्यालये सुरु आहेत़ काही कार्यालये स्वतंत्र्यपणे शासकीय जागेवर तर काही कार्यालये भाड्याच्या इमारतीतून प्रशासकीय कारभार सांभाळीत आहे़ त्यामुळे नागरिकांना आपली कामे करताना चांगलेच हेलपाटे घ्यावे लागते़ या कार्यालयातून त्या कार्यालयात जाताना वेळ खर्ची होतो़ सोबतच अशी अनेक कामे असतात की जी अनेक विभागांंशी संबधित असतात़ अशावेळी एकाच इमारतीतून सर्व प्रशासकीय कार्यालयाचा कारभार चालल्यास नागरिकांसाठी आपली कामे करताना वेळ व पैश्याची बचत होईल़ या हेतुने या इमारतीची उभारणी करण्यात आली. परंतु इमारतीचे लोकार्पण होऊन सहा महिन्याचा कालावधी लोटला असतानाही तहसीलदार रणजित भोसले सोडले तर इतर अधिकाऱ्यांना या इमारतीचे वावडे असल्याचे दिसून येते. या प्रशासकीय इमारतीत दुय्यम उपनिबंधक कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नोंदणी कार्यालय आदींसाठी अद्यावत बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत सोबतच इमारतीमध्ये व्हीआयपी रुम, व्हीडीओ कॉन्स्फरन्स हॉलसह स्वतंत्र्य कॉन्स्फरन्सची व्यवस्था, आॅडीटोरीयम सभागृहाचीही निर्मिती करण्यात आली आहे, असे असताना इतर कार्यालय प्रमुखांनी या इमारतीत येण्यास का टाळाटाळ चालविली याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहे. विशेष म्हणजे तहसीलदार रणजित भोसले यांनी यासंबधी सर्व कार्यालयाशी पत्रव्यवहारही केल्याचे त्यांनी सांगितले. तरीही सध्या कुणी यायला तयार नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरच आता या घडामोडींची दखल घेण्याची गरज आहे.