शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

आता अनिलच्या डोळ्यात आॅलिम्पिक पदकाचे वेध

By admin | Updated: August 29, 2015 02:42 IST

पुसद तालुक्यातील नाणंद हे डोंगराच्या कुशीत वसलेले १५०० लोकवस्तीचे लहानसे गाव.

यवतमाळचे वैभव : जागतिक व एशियन कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व, प्रतिकल परिस्थितीत मिळविले घवघवीत यशनीलेश भगत  यवतमाळपुसद तालुक्यातील नाणंद हे डोंगराच्या कुशीत वसलेले १५०० लोकवस्तीचे लहानसे गाव. दिवाळीच्या सणानिमित्त आयोजित कुस्त्यांच्या दंगलीत १० वर्षाचा किरकोळ पण काटक शरीरयष्टीचा आदिवासी मुलगा हौदात लंगोट बांधून कुस्तीसाठी तयार होता. कुस्ती सुरू झाली त्याने क्षणात विजेच्या चपळाईने प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवून कुस्ती जिंकली. त्याला नारळ व दहा रुपयाचे रोख बक्षीस मिळाले. दंगलीतील या एका कुस्तीने त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. कुस्तीला आपल्यापासून कधीही लांब करायचे नाही, असे त्याने ठरविले, अथक मेहनत घेतली. एक-एक स्पर्धा जिंकत चक्क आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचला. सातासमुद्रापार तिथे एक दोन नव्हे तर चार आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. गावातील दंगलीच्या कुस्तीपासून थेट जागतिक कुस्तीपर्यंत उत्तुंग भरारी घेणाऱ्या युवकाचे नाव आहे अनिल काळूराम तोरकड़ १६ जून १९९७ ही त्याची जन्मतारिख. नाणंद या छोट्याशा गावात तीन एकर शेतीवर तोरकड कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालतो. अनिल पाचव्या वर्गात असताना वडिलांचा मृत्यू झाला. दोन मुलं व एक मुलगी अशा परिवाराचा आईच आता संसाराचा गाडा चालविते. गावात भौतिक सोयीसुविधा व दळणवळणाच्या कोणत्याच सुविधा नाही. शाळा केवळ १ ते ५ पर्यंत, अशा विपरित परिस्थितीत राहणाऱ्या गावाला मात्र कुस्त्यांचे भारी वेड. दरवर्षी दिवाळीला कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन होते. अनिलचे आजोबा चांगली कुस्ती खेळायचे. आजोबांनीच त्याला कुस्तीच्या हौदाकडे नेले. दोन-चार कुस्त्या जिंकल्यावर अनिललाही कुस्ती आवडू लागली. पाचवीनंतर गावात शिक्षणाची सोय नसल्याने गावातील अनेक मुले रामकृष्ण क्रीडा आश्रमशाळा अमरावती येथे राहून पुढील शिक्षण घेत होती. अनिलला या आश्रमशाळेत प्रवेश मिळाला. येथेही त्याने कुस्तीचा सराव सुरूच ठेवला. दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रा. संजय तिरथकर यांनी अनिलला कुस्ती खेळताना पहिले त्यांनी अनिलचे कुस्तीतील गुण हेरले व त्याला तंत्रशुद्ध प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. दोन-तीन वर्षात तो बऱ्यापैकी तयार झाला. ९ वीला असताना अनिलने पहिली जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा जिंकली. याच वर्षी तो राज्यस्तरावर पोहोचला. राज्यस्पर्धेत मात्र पहिल्याच सामन्यात पराभव झाला. अनिल हताश झाला. प्रा. तिरथकरांनी त्याला धीर दिला. त्याची लढाई भारतातील खेळाडुंसोबत नाही तर त्याला जगाशी लढायचे आहे, हा आत्मविश्वास त्यांनी दिला. एखाद्या खेळाडुच्या आयुष्यात गुरूचे किती महत्व आहे याची जाणीव अनिलला झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उंचवायचे हे ध्येय बाळगून अनिलने पुढे अथक मेहनत घेतली. पुढच्याच वर्षी अनिलने राज्य कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक आणले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. कन्याकुमारी येथे झालेल्या स्पर्धेत ४२ किग्रॅ वजनाच्या गटात सुवर्ण पदक जिंकून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर जुलै २०१३ मध्ये अनिलची मंगोलिया येथील एशियन कॅडेट कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. त्याची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा. येथेही त्याने चांगले प्रदर्शन केले. त्याचवर्षी युरोपमध्ये सर्बिया देशात जागतिक कुस्ती स्पर्धा झाली. या स्पर्धेतही अनिलची भारतीय संघात निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याची कामगिरी उंचावत गेली. २०१४ मध्ये थायलंड येथे एशियन कुस्ती स्पर्धेत त्याला अकरावे स्थान मिळाले. त्याच वर्षी स्लोवाकिया देशात झालेल्या जागतिक स्पर्धेत वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी करीत सातवा क्रमांक पटकाविला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्वत:च्या कामगिरीवर तो समाधानी नाही आता त्याला वेध लागले ते आॅलिम्पिक स्पर्धेचे देशासाठी पदक जिंकण्याचे. यासाठी तो दररोज सहा तास अथक मेहनत करीत आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ त्याचे हे ध्येय गाठण्यासाठी त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. सध्या पुणे येथील काका पवारांच्या तालिम केंद्रात अनेक कुस्तीतील अद्ययावत डावपेच शिकत आहे. भविष्यात आॅलिम्पिकचे ध्येय गाठत असताना अनिलला नवनवीन विक्रमाला गवसणी घालायची आहे.