शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आता दीड महिन्यात बांधकाम परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 21:42 IST

नगरपरिषदेतील बांधकाम परवानगी मिळविणे हे अतिशय क्लिष्ट व त्रासदायक काम आहे. वारंवार चकरा मारूनही परवानगीला अडथळे निर्माण केले जातात. नियमबाह्य काम करणाऱ्यांसाठी मात्र फार त्रास होत नाही. आता ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपरिषदेचा दावा : आॅनलाईन प्रक्रियेने गती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेतील बांधकाम परवानगी मिळविणे हे अतिशय क्लिष्ट व त्रासदायक काम आहे. वारंवार चकरा मारूनही परवानगीला अडथळे निर्माण केले जातात. नियमबाह्य काम करणाऱ्यांसाठी मात्र फार त्रास होत नाही. आता ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ४५ दिवसात बांधकामाची आॅनलाईन परवानगी देत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.बांधकाम परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर तो चार टप्प्यातून जातो. नोंदणीकृत कन्सल्टंटकडून बांधकामाच्या नकाशासह प्रस्ताव दाखल केला जातो. त्यानंतर क्लर्क, शाखा अभियंता, नगररचनाकार व मुख्याधिकारी असा या अर्जाचा प्रवास होतो. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान ४५ दिवस लागतात. अनेकदा त्रुट्या असल्याने अर्ज परत संबंधित आर्किटेक्टकडे पाठविले जातात. नगरपरिषदेकडे शहरातील १०१ आर्किटेक्ट नोंदणीकृत आहेत. आतापर्यंत १ मे २०१८ पासून आॅनलाईन प्रक्रियेसाठी २२८ अर्ज दाखल झाले. यापैकी ६० अर्ज निकालात काढून परवानगी देण्यात आली. ९२ अर्ज शाखा अभियंतास्तरावर आहे, ३२ अर्ज नगररचनाकारांकडे आहे व ११ अर्ज मुख्याधिकाºयांकडे असल्याचे आॅनलाईन प्रक्रियेत दिसते. २७ प्रकरणे त्रुट्या असल्याने संबंधित आर्किटेक्टकडे परत पाठविली आहे.आॅफलाईन अर्ज केलेल्यांची अडचणनगरपरिषदेत बांधकाम परवानगीची प्रक्रिया मे महिन्यापासून आॅनलाईन झाली. मात्र त्यापूर्वीचे अनेक अर्ज नगरपालिकास्तरावर प्रलंबित आहेत. २०१७ पासूनची प्रकरणे येथे कोणत्याही कारणाविना अडविण्यात आली आहे. दोन वर्षांपासून घराच्या बांधकाम परवानगीसाठी चकरा मारून थकलेल्यांनी अखेर बांधकाम सुरू केल्याचेही दिसून येते. पालिकेच्या धोरणामुळे या बांधकाम परवानगीसाठी अर्ज केलेल्यांची अडचण झाली आहे.नगरपरिषदेच्या एकंदरच प्रशासकीय कामकाजाची घडी विस्कटली आहे. येथील रिक्त पदांचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असल्याने वेळेत काम होत नाही. शिवाय पदाधिकाºयांमध्ये अंतर्गत मतभेद टोकाचे असून याचा परिणाम प्रशासकीय कामावर होताना दिसत आहे. जनतेच्या सेवेचे येथे कोणालाच सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. प्रत्येकच ठिकाणी काही ना काही कारणावरून अडचणी निर्माण होत आहे.मंजूर आराखडा व प्रत्यक्ष बांधकामात तफावतअनेक बांधकामांमध्ये परवानगीसाठी दाखल केलेला नकाशा वेगळा आणि प्रत्यक्ष बांधकाम होत असलेला नकाशा यात तफावत आहे. अनेक ठिकाणी नगररचना कायद्याचे पालन केले जात नाही. त्यानंतरही या बांधकामाकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. सर्वसामान्यांना मात्र नाहक भूर्दंड सोसावा लागतो. व्यावसायिक व बिल्डरांच्या परवानग्या कोणत्याही त्रुट्याविना झटक्यात पूर्ण होतात, असा अनेकांचा अनुभव आहे.विकास शुल्कात होते तडजोडठराविक व्यक्तीच्या माध्यमातूनच प्रस्ताव सादर केल्यानंतर विकास शुल्कामध्ये तडजोड केली जाते. नव्या ले-आऊटमध्ये नाली, रस्ता नसताना बांधकाम परवानगी घेण्यासाठी विकास शुल्काचा भार सोसावा लागतो. एका परवानगीसाठी किमान ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. सर्वसामान्यांना ही रक्कम न सोसणारी आहे. अशा स्थितीत दलालांना हाताशी पकडून तडजोडी केल्या जातात. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका