शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

निर्मल निर्गुडेचे काम युद्ध पातळीवर

By admin | Updated: May 20, 2016 02:06 IST

शहरासह परिसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून सुरू झालेल्या ‘मिशन निर्मल निर्गुडे’चे काम लोकसभागातून युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

पाच मशीन, एक लोडर : २० ते २२ लाखांचा खर्च अपेक्षितवणी : शहरासह परिसरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून सुरू झालेल्या ‘मिशन निर्मल निर्गुडे’चे काम लोकसभागातून युद्ध पातळीवर सुरू झाले आहे. प्रत्यक्ष काम बघून समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग मिळत आहे. आता ही लोकचळवळ निर्माण होत आहे. निर्गुडेच्या स्वच्छतेसाठी भरीव मदतीकरिता अनेकांनी सहभाग नोंदविला आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यात मिशन निर्मल निर्गुडाच्या योजनेसंदर्भात विचारमंथन करण्यात आले. प्रत्यक्ष पावसाळा सुरू व्हायला किमान १५ ते २० दिवसाचा अवधी आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून गणेशपूरच्या पुलापासून चिखलगावच्या पुलापर्यंत नदीचे खोलीकरण व रूंदीकरणाचे उद्दीष्ट १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामाला सुरूवात झाली. पंप हाऊसजवळील मोठे खडक मशीनद्वारे फोडून नदीचे पात्र रूंद करून ते खोल करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीत जादा जलसाठा सुरक्षित राहील. या कामासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून चिखलगाव पुलाजवळ पाच मशीन व एक लोडर, माती उचलण्यासाठी व नदीतील माती बाहेर फेकण्यासाठी पाच टिप्परची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी आमदार बोदकुरवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिशन निर्मल निगुर्डा’ समितीतर्फे बैठक घेण्यात आली. यावेळी निधी संकलन समितीचे गठन करण्यात आले. समितीत आमदार बोदकुरवार, राजाभाऊ पाथ्रडकर, डॉ.महेंद्र लोढा, राकेश खुराणा, रवी बेलुरकर, प्रा.महादेव खाडे, तर देखरेख समितीत सिद्दीक रंगरेज, अभिजित सातोकर, अभियंता दलाल, जलपूर्ती अभियंता गायकवाड, माजी मुख्याधिकारी कावटकर यांचा समावेश आहे. (कार्यालय प्रतिनिधी)