शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने काढले नव्या रस्त्याचे वाभाडे

By admin | Updated: September 25, 2016 02:54 IST

रस्त्याच्या बांधकामानंतर कमीत-कमी दोन वर्षापर्यंत त्या कामात कोणताही दोष निघू नये, असे अपेक्षित असते.

निकृष्ट काम : दोषदायित्व कालावधीतच लागली वाटकळंब : रस्त्याच्या बांधकामानंतर कमीत-कमी दोन वर्षापर्यंत त्या कामात कोणताही दोष निघू नये, असे अपेक्षित असते. परंतु, येथील कळंब-जोडमोहा रस्ता दोषदायित्व कालावधीतच उखडू लागला आहे. परतीच्या पावसाने या रस्त्याच्या बांधकामातील दोष चव्हाट्यावर आणले आहे. त्यामुळे आता या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. कोणत्याही रस्त्याच्या बांधकामानंतर तो कमीत-कमी दोन वर्षापर्यंत सुस्थितीत असणे शासनास अभिप्रेत आहे. तसा नियमही आहे. यालाच दोषदायित्व कालावधी म्हटले जाते. या कालावधीत काही त्रुटी उघड झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असते. परंतु, कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधांतून कंत्राटदाराला वाचविण्याचाच प्रयत्न केला जातो. अशीच परिस्थिती कळंब-जोडमोहा रस्त्याच्या बाबतीत घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या डांबरी रस्त्यावरुन पावसाळ्याच्या दिवसात ‘जलवाहतूक’ करावी लागते. कारण पाऊस आला की संपूर्ण रस्ता जलमय होतो आणि नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. शाखा अभियंत्याकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कळंब शहरातून दत्तापूरकडे जाणारा हा रस्ता जवळपास अर्धा किलोमीटर दुतर्फा करण्यात आला. रस्त्याचे डांबरीकरण व नालीचे बांधकाम करण्यात आले. यासाठी जवळपास ७० लाख रुपये खर्च करण्यात आले. दोन्ही बाजूला लाखो रुपये खर्च करुन सिमेंट नाल्या तयार करण्यात आल्या. परंतु, पावसाचे पाणी वाहून जाण्यास व्यवस्थित उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे पाऊस पडला की, संपूर्ण पाणी रस्त्यावर साचते. विशेष म्हणजे, जेव्हा सदर बांधकाम सुरु होते, तेव्हा संबंधित शाखा अभियंत्याला वारंवार पाणी जाण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था केल्या जात नाही, याची कल्पना देण्यात आली. परंतु, लोकांच्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करीत कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचे काम करण्यात आले. आता हा रस्ता उखडू लागला आहे. दोषदायित्व कालावधीत उखडलेला रस्ता नियमानुसार कंत्राटदाराकडून करुन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित विभाग कोणती ठोस कारवाई करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आलेला हा रस्ता पावसाळ्यात नागरिकांनाची डोकेदुखी ठरतो. एवढेच नाहीतर रस्त्यावर पाणी साचून राहत असल्यामुळे डांबरी रस्ता खराब व्हायला लागला आहे. कुठे उखडला गेला तर काही ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आतापासूनच या रस्त्याच्या उपयोगितेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व अभियंत्याविरुद्ध कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. (तालुका प्रतिनिधी)