शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या युनियन बँकेचा दलाल ‘सीबीआय’च्या जाळ्यात

By admin | Updated: September 17, 2016 02:45 IST

कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या येथील युनियन बँकेच्या दलालास सीबीआयने अटक केली.

नेर : कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या येथील युनियन बँकेच्या दलालास सीबीआयने अटक केली. गुरूवारी त्याच्या घराची झडती घेण्यात आली. सोबतच बँकेची तब्बल सहा तास गोपनीय चौकशी करण्यात आली. या कारवाईमुळे सदर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारीही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अमरावती जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील कवठा येथील उमेश कुकडे यांची नेर तालुक्यात चार एकर शेती आहे. ६० हजार रुपये पीक कर्जासाठी त्यांनी युनियन बँकेच्या येथील शाखेकडे अर्ज केला. बरेच दिवस लोटूनही कर्ज मंजूर झाले नाही. दरम्यान, या बँकेचा बिजीनेस कॅसीलेटर (दलाल) तथा ग्रामपंचायत सदस्य असलेला विश्वंभर जांभूळकर रा. वटफळा याने या शेतकऱ्याला गाठले. कर्ज मंजुरीसाठी त्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली. या प्रकाराची तक्रार शेतकरी उमेश कुकडे यांनी सीबीआयच्या नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. १४ सप्टेंबरला या पथकाने गोपनीय पद्घतीने खातरजमा केली. पुढील कारवाईच्या दृष्टीने शेतकऱ्याशी चर्चा केली. ठरल्यानुसार गुरूवार १५ सप्टेंबर रोजी दलाल विश्वंभर जांभुळकर याला बँकेच्या खाली बोलाविले. तीन हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडले. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या वटफळा येथील घरातील दस्तावेजाची तपासणी केली. शिवाय बँकेचीही सहा तास चौकशी करण्यात आली. अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी केली. सदर प्रकारात आणखी कोणाचा समावेश आहे, हे चौकशीत पुढे येणार आहे. काही वर्षांपूर्वी याच बँकेच्या मांगलादेवी शाखेतील व्यवस्थापकाला सीबीआयच्या पथकाने लाच स्वीकारताना पकडले होते. ही संपूर्ण कारवाई सीबीआयचे सहायक पोलीस आयुक्त लांबाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. राष्ट्रीयकृत बँकेत कुणी दलाल, कर्मचारी लाच मागत असेल तर थेट तक्रार करा, असे आवाहन लांबाडे यांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)