शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नेरचा फुटबॉलपटू चित्रपटात चमकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:50 IST

फुटबॉलच्या प्रेमापोटी घर सोडून हॉटेलात काम करीत शास्त्रशुद्ध शिक्षण घेत जागतिकस्तरावर नेरची मान उंचाविणाºया तरुणाची आता दुसरी इनिंग सुरू होत आहे.

ठळक मुद्देहोमकांत सुरंदशे : सैराटफेम नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात, नवीन इनिंग सुरू

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर (यवतमाळ) : फुटबॉलच्या प्रेमापोटी घर सोडून हॉटेलात काम करीत शास्त्रशुद्ध शिक्षण घेत जागतिकस्तरावर नेरची मान उंचाविणाºया तरुणाची आता दुसरी इनिंग सुरू होत आहे. सैराटफेम नागराज मंजुळे यांच्या ‘विजय स्टिफन द मिरॅकल मॅन’ या चित्रपटात तो फुटबॉलपटूची भूमिका साकारणार आहे. होमकांत सुरंदशे असे या तरुणाचे नाव असून, महानायक अमिताभ बच्चनसोबत अभिनय करण्याची त्याला संधी मिळाली आहे.तालुक्याचे ठिकाण असलेल्या नेरमध्ये कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी तसे पोषक वातावरण नाही. परंतु होमकांत सुरंदशे या तरुणाने परिस्थतीवर मात करीत फुटबॉल खेळात आपलेच नव्हे तर आपल्या गावाचे नावही चमकविले. वायरमन असलेल्या रामकृष्ण सुरंदशे यांचा होमकांत हा मुलगा शालेय जीवनात त्याने फुटबॉलच्या विविध स्पर्धा गाजविल्या. परंतु नेर सारख्या ठिकाणी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार नाही म्हणून त्याने घर सोडले. नागपूर गाठून तेथे एका हॉटेलात काम करत फुटबॉलचे शिक्षण घेऊ लागला. त्याच्यातील धडाडीचा खेळाडू विजय बारसे यांनी ओळखला. त्याला फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. तेथूनच होमकांतची कारकिर्द फुलली. जर्मनी, आॅस्ट्रेलिया या देशात जाऊन तो खेळला. ब्राजीलमध्ये कोच म्हणून सहभागी झाला. फुटबॉल खेळाबाबत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत नागराज मंजुळे यांनी विजय बारसे यांच्या फुटबॉल खेळावर आधारित चित्रपटाची घोषणा केली. ‘विजय स्टिफन बारसे द मिरॅकल मॅन’ हा चित्रपट नागराज मंजुळे तयार करणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची भूमिका आहे. यात होमकांत फुटबॉल खेळाडुची भूमिका साकारणार आहे.होमकांतने फुटबॉल खेळासोबतच आता चित्रपटातही इनिंग सुरू केली आहे.