शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

नेरच्या व्यापाऱ्यांवर गुन्हा, जादा तूर विक्री भोवली

By admin | Updated: May 28, 2017 00:42 IST

शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकणाऱ्या येथील चार व्यापाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क नेर : शेतकऱ्यांच्या नावावर आपली तूर विकणाऱ्या येथील चार व्यापाऱ्यांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहकार विभागाच्या या कारवाईने व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. नाफेडच्या तूर खरेदीत घोटाळा झाल्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेली तूर अत्यंत कमी दरात व्यापाऱ्यांनी खरेदी केली. तीच तूर शासकीय हमी दराने शासकीय केंद्रांवर विकली. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर अनेक व्यापाऱ्यांनी आपली तूर शासकीय केंद्रांवर विकल्याचे उघडकीस आले. यातून व्यापाऱ्यांनी शासनाची व शेतकऱ्यांचीही फसवणूक केली. जादा पैसा लाटून व्यापारी गब्बर झाले. याप्रकरणी येथील युवा संघर्ष समितीने तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीवरून सहकार विभागाने नेर येथील खरेदी केंद्रावर खरेदी झालेल्या तुरीची चौकशी केली. यात शेतकऱ्यांची तूर कमी दरात घेऊन व्यापाऱ्यांनी तीच तूर शासकीय केंद्राला विकल्याचे उघड झाले. याप्रकरणात येथील १६ व्यापारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. त्यापैकी चार प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर झाला. त्यात सूरज लुणावत, किरण लुणावत, सुभाष लुणावत आणि किशोर लुंकड हे चार व्यापारी दोषी आढळल्याने सहायक निबंधक गोपाल कुमरे यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध भादंवि ४२० कलमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी चार व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली. उर्वरित व्यापाऱ्यांची चौकशी सुरू असून ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करू. - रवींद्र राऊत सभापती, बाजार समिती, नेर