शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ

By admin | Updated: July 3, 2014 23:47 IST

वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे.

पाटणबोरी : वाराणसी ते कन्याकुमारी या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातचे काम देशात युध्द पातळीवर सुरू असताना पाटणबोरी ते पांढरकवडा दरम्यानच्या केवळ २५ किलोमीटरचेच काम गेल्या पाच वर्षांपासून रेंगाळले आहे. दक्षिण भारतात जवळपास पूर्णत्वास गेलेल्या या महामार्गाचे काम महाराष्ट्रात अद्याप अर्धवटच आहे.या महामार्गाचे कित्येक ठिकाणी काम थांबले आहे़ या महामार्गाचे प्रत्येकी २५ किलोमीटर अंतराचे टप्पे पाडून एकाच वेळी अनेक कंपनींना काम विभागून देण्यात आले. त्यातील काही कंपन्यांनी गाशा गुंंडाळल्याने तेच काम पुन्हा दुसऱ्या कंपनीला देण्यात आले. पिंपळखुटी ते केळापूर दरम्यानचा २५ किलोमीटरचा टप्पाही त्यामुळे रखडला आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे़या महामार्गावर पाटणबोरी ते केळापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यातच रस्ता खोदकामामुळे अरूंद झाला. त्यामुळे वाहनधारकांना या मार्गावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे़ परिणामी अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ हे काम करताना पूर्वीच्या रस्त्यावर असलेले खड्डे बुजविणे आवश्यक होते. मात्र तसे करण्यात आले नाही. तसेच जेथे रस्ता पूर्ण उखडला, तेथे डांबरीकरणाचा थर टाकण्याची गरज आहे़ मात्र त्या दृष्टीने काहीच हालचाल होत नाही. या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात दिवस-रात्र जड वाहतूक सुरू असते. परिणामी मार्गावरील खड्ड्यात पुन्हा भरत पडत आहे. वाहनधारकांना अपघात झाल्यास आपले प्राण गमवावे लागत आहे. नॅशनल हायवे आॅथॉरीटी मात्र डोळे लावून बसून आहे. या अ‍ॅथॉरीटीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलून चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांपासून काम रखडल्याने पूर्वीच्या रस्त्याचीही दुर्दशा झाली. याच मार्गावर वर्षभरापूर्वी तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे वाहन पंक्चर झाले होते, हे विशेष. तरीही अद्याप काम संथच आहे. (वार्ताहर)